फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या प्रतिष्ठेच्या सन 2018 च्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा आज संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. यंदाचा विशेष दर्पण पुरस्कार लोकमतचे तालुका प्रतिनिधी नसीर इसाकभाई शिकलगार यांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे - देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर कुटूंबिय यांच्या संयुक्त सहकार्याने राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आदरांजली वाहण्याचा विशेष कार्यक्रम पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील दर्पण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वरील घोषणा बेडकिहाळ यांनी केली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे (गडहिंग्लज, जि.कोल्हापूर), पत्रकार डॉ.ग.गो.जाधव चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूरच्या पत्रकारिता अभ्यासकेंद्राचे केंद्रप्रमुख अॅड.वसंत सप्रे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, देवगडचे तहसीलदार मारुती कांबळे, वैभववाडीचे पोलीस निरीक्षक संतोष कोळी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, पोंभुर्ले गावचे सरपंच सादीक डोंगरकर, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेतर्फे दिल्या जाणार्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे हे 26 वे वर्ष आहे. आज जाहीर झालेले अन्य दर्पण पुरस्कारार्थी पत्रकार याप्रमाणे - ज्येष्ट संपादक पुरस्कार शामराव अहिवळे(संपादक दैनिक गंधवार्ता) विशेष दर्पण पुरस्कार नसीर इसाकभाई शिकलगार( प्रतिनिधि दैनिक लोकमत,फलटण) ‘दर्पण’ पुरस्कार कोकण विभाग - राजेश परशुराम जोष्टे (प्रतिनिधी, दै.पुढारी, रत्नागिरी), उत्तर महाराष्ट्र विभाग - महेंद्र शामकांत देशपांडे (संपादक, सा.नाशिक वृत्तवैभव, नाशिक), पश्चिम महाराष्ट्र विभाग - प्रकाश नामदेव कांबळे (प्रतिनिधी, दै.सामना, सांगली), मराठवाडा विभाग - उमेश श्रीकृष्ण काळे (वृत्तसंपादक, दै.पुढारी, औरंगाबाद), विवेक केरुरकर (संपादक सा.सार्वभौम जनता, देगलूर), विदर्भ विभाग - अनिल केशवराव पळसकर (संपादक, सायं.दै.विदर्भ दर्पण, चिखली), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील, कराड पुरस्कृत धाडसी ‘दर्पण’ पुरस्कार शर्मिष्ठा भोसले (मुक्त पत्रकार, मुंबई), बृहनमहाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुरस्कृत पत्रमहर्षी वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक दर्पण पुरस्कार डॉ.हंसराज वैद्य (नांदेड), राजेंद्र उर्फ राजू दत्तात्रय वाघमारे (मुक्त पत्रकार, पुणे)
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |