04:27pm | Jul 02, 2019 |
चिपळूण : तालुक्यातील पोफळी येथील वीजनिर्मिती केंद्राच्या चौथा टप्पा येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने मानेमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोफळी वीज निर्मिती केंद्रात खळबळ उडाली आहे. सुनील पाटील (32) असे या पोलिस कर्मचार्याचे नाव असून तो मूळचा सातारा येथील आहे. ही घटना सोमवारी (दि. 1) दुपारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पाटील हे चौथा टप्पा येथील ईव्हीटी गार्ड येथे सुरक्षेसाठी तैनात होते. दुपारच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील बंदुकीच्या साहाय्याने मानेमध्ये गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. यामुळे कोयना वीज प्रकल्प परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत तर्कवितर्क सुरू असून अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेचे वृत्त समजताच शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बडेसाहब नायकवडी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव यांनीदेखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेचा पंचनामा पोलिसांनी करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |