सातारा : पुसेगाव येथील राजेश ट्रेडिंग कंपनी या दुकानाचा दुकानदार राजेश मोहनलाल शहा (वय 55, रा.पुसेगाव) याला बलात्काराच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयिताने महिलेवर सातार्यातील लॉजमध्ये बलात्कार केला असल्याची तक्रार दाखल आहे. दरम्यान, परस्परविरोधी तक्रार दाखल असणार्या दुसर्या गुन्ह्यातील संशयित तीन महिलांनाही पोलिसांनी अटक केली असता त्यांनाही पोलिस कोठडी मिळाली आहे.
संशयित राजेश शहा याच्याविरुध्द गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुणे येथील ओळख झालेल्या महिलेला सातार्यात त्याने बोलावून वाढे फाटा येथील प्राईड लॉजमध्ये बलात्कार केला आहे. याप्रकरणातील तक्रारदार महिला 33 वर्षीय आहे. या सर्व घटनेमुळे सातारा व पुसेगाव येथे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राजेश शहा यांनीही तीन महिलांसह कुमार पवार, बाबू (सर्व रा.पुणे) यांच्याविरुध्द खंडणीची तक्रार दिली आहे. राजेश शहा यांना गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईलवर यातील एका संशयित महिलेचा फोन आला होता. ओळख झाल्यानंतर वारंवार फोन होवून भेटण्याबाबत चर्चा होवू लागल्याने गुरुवारी भेटायचे ठरले. महिलेशी भेट झाल्यानंतर चर्चा झाली. त्यानंतर काही वेळाने इतर संशयित त्याठिकाणी आले व त्यांनी तक्रारदार यांना दमदाटी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या चर्चेवेळी इतर संशयितांनी हे प्रकरण पुढे न वाढवता महिलेला 50 लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ही रक्कम ऐकूण शहा यांनी एवढे पैसे नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानुसार त्यांनी महिलांस सर्वाविरुध्द खंडणीची तक्रार दिली. खंडणीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी महिलांनाही अटक केली व त्यांना कोर्टात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |