02:07am | Oct 04, 2018 |
कोरेगाव : कोरेगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या डी.पी. भोसले कॉलेजच्या जाहीर कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार कोरेगाव नगरीत येत आहेत. या जाहीर कार्यक्रमाआधी आज गुरूवारी 4 रोजी दुपारी 3 च्या सुमारास खा. शरद पवार यांची आ. शशिकांत शिंदेंच्या ल्हासुर्णे येथील कोठीत उद्या पवारांचे 'गुफ्तगू' होणार आहे.
या बैठकीत कोरेगाव तालुका, विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी अंतर्गत झालेली बंडखोरी, भिशी मंडळाच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यात सुरू असलेली नेतृत्व बदलाची मोहीम, लोकप्रतिनिधींकडून निष्ठावान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची होणारी मुस्कटदाबी. कोरेगाव मतदार संघाचा रखडलेला विकास, अपूर्ण सिंचन योजना, वाढलेली बेरोजगारी यातून मतदारांच्यामध्ये पसरलेली नाराजी, या व इतर अनेक महत्वपूर्ण बाबीवर खा. शरद पवार काय निर्णय घेणार? याकडे कोेरेगाव, सातारा, खटाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राष्ट्रवादीचे नेते आज एका जाहीर कार्यक्रमानिमित्ताने कोरेगाव शहरात येत आहेत. कोरेगाव शहर हे सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्याला जोडणारे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील मध्यवर्ती शहर आहे. मतदार संघातील महत्वपूर्ण घडामोडींचे पडसाद नेहमीच कोरेगाव शहरात उमटत असतात. सध्या गेल्या वर्षापासून कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी अंतर्गत मोठे बंड उभारले आहे. राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात राज्याचे जलसंपदा, मंत्रीपद, पालकमंत्रीपद मिळूनदेखील कायम दुष्काळी परिस्थिती असणार्या शेतकर्यांसाठी शेतीच्या पाणी प्रश्न, वसना उपसा सिंचन योजना, वांगना, उरमोडी सिंचन योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे कोरेगाव, खटाव तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकरी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहिला. राज्याचे मंत्रीपद मिळूनही कोरेगाव, खटाव तालुक्याचे औद्योगिकरण झाले नाही. लोकप्रतिनिधींनी आश्वासने देवूनही गेल्या नऊ वर्षात कोरेगाव, खटाव तालुक्यात पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी राहिली नाही.
येथील औद्योगिक वसाहतीला अवकळा प्राप्त झाली. वसाहतीमधील अनेक मोठे उद्योगधंदे जिल्ह्याबाहेर गेले. निवडणुकांमध्ये आश्वासने देवूनही कोरेगाव, खटाव परिसरात इंजिनिअरींग, मेडिकल कॉलेजसह इतर उच्च शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या नाहीत. लोकप्रतिनिधींनी आश्वासने देवूनही कोरेगाव मतदार संघातील खेड, कोरेगाव, सातारारोड, कुमठे, भाडळे, पुसेगाव, खटाव आदी गावांचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला नाही. त्यामुळे मतदार संघातील मोठ्या गावांचा समावेश झाला नाही. पुसेगाव येथे विमानतळ, भुयारी गटर योजना, उद्याने, क्रीडा संकुले यापैकी काहीही सुविधा कोरेगाव झाल्या नाहीत. निष्ठावान कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांची दखल घेतली नाही. गेल्या नऊ वर्षात विद्यमान लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाने वाळू तस्कर, ठेकेदार, मद्यविक्रेते, लँडमाफिया, गुंडांना राजाश्रय दिला. त्यामुळे मतदारसंघात अवैध धंदा करणार्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. अशा अनेक कारणाने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबद्दल नाराजी आहे. याविरूद्ध तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी बंड केले आहे. हे नेतृत्व बदलण्याची मागणी खा. शरद पवार, आ. अजित पवार यांच्याकडे केली आहे.
भिशी मंडळाच्या माध्यमातून केलेल्या नेतृत्व बदलाचे लोन आता कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यात पोहचले आहे. या पार्श्वभूमीवर आज खा. शरद पवार यांची आ. शशिकांत शिंदे यांच्या समवेत त्यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. बैठकीत शरद पवार काय निर्णय घेणार? याकडे कोरेगाव, खटाव तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |