04:44pm | Jan 06, 2020 |
कराड : कराड येथील वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कराडकरांचे आरोग्य चांगले रहावे, या भावनेतून उभ्या राहिलेल्या संजीवन मेडिकल सेंटर या अद्यावत सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा काल दि. 5 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार भव्य शुभारंभ करण्यात आला.
कराड शहरामध्ये जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा अत्युच्य दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. यामध्ये संजीवन मेडिकल या अद्यावत सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा समावेश झालेला आहे. काल दि. 5 जानेवारी रोजी कृष्णा चेरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश जयवंतराव भोसले यांच्या हस्ते संजीवन मेडिकल सेंटर या अद्यावत सुपर स्पेशालिटी क्लिनिकचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार अमरदीप वाकडे, डॉ. नितीन क्षीरसागर आदी उपस्थित होते.
संजीवन सुपर मेडिकल सेंटरमध्ये कार्डिओलॉजी, वंध्यत्व चिकित्सा, एन्डोस्कोपि सर्जरी, सोनोग्राफी, हॉमोन तपासणी, लेप्रोस्कोपी, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, कार्डिओलॉजी विभागामध्ये हृदयविषयक सल्ला व मार्गदर्शन, टू डी इको कार्डिओग्राफी, होल्टर तपासणी, स्ट्रेस टेस्ट आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती डॉ. विजयसिंह पाटील यांनी दिली. कराडमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत. डॉ. विजयसिंह पाटील, वंध्यत्व तज्ञ डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. सचिन कुलकर्णी, एन्डोस्कोपी तज्ञ डॉ. प्रिया जैन यांच्या अनुभवाचा रुग्णांना निश्चितच फायदा होणार आहे, असे प्रतिपादन कृष्णा चेरिटबल ट्रस्टचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार अमरदीप वाकडे, डॉ. नितीन क्षीरसागर, डॉ. सचिन कुलकर्णी यांनी आरोग्याशी निगडीत विविध प्रश्नांचे व व्याधींचे विवेचन करुन आरोग्याच्याबाबतीत सजग राहण्याविषयी मार्गदर्शन करीत डॉ. विजयसिंह पाटील व त्यांच्या भगिनी डॉ. भाग्यश्री पाटील यांनी सुरु केलेल्या संजीवन सुपर मेडिकल क्लिनिकला शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. तर यावेळी डॉ. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला कराडसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर व रुग्ण उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |