कराड : बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय देसाई यांचे कार्यालय फोडून चोरट्यांनी 6 लाखांची रोख रक्कम लंपास केली. तर याच कार्यालयाशेजारील इमारतीमध्ये असणार्या इंडसइंड बँकेची शाखाही चोरट्यांनी फोडली. मात्र, सुदैवाने तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. शनिवारी (दि. 30) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कायम रहदारीच्या राष्ट्रीय महामार्गालगत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांत खळबळ उडाली.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे व वरीष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी श्वानपथक व ठसेतज्ञांना तात्काळ पाचारण केले. घटनेनंतर पोलिस दलाने या प्रकरणी दाखवलेल्या तत्परतेचे मात्र लोकांनी कौतूक केले.
कराड तालुक्यातील वाठार येथील दत्तात्रय हणमंतराव देसाई यांचा बांधकाम व्यवसायाबरोबरच पेट्रोल पंपही आहे. त्यांनी वाळू विक्रीतून जमा झालेली रक्कम तसेच मजुरांची दैनंदिन कामाची मजुरी, खरेदी केलेल्या बांधकाम साहित्याचे पेमेंट करण्यासाठी ठेवलेली रक्कम असे एकूण 5 लाख 90 हजार एवढी रक्कम आपल्या कार्यालयात आणुन ठेवली होती. या रक्कमेतून देसाई हे रविवारी मजुरांची मजुरी, बांधकाम साहित्याचे देणे देणार होते. मात्र, त्यापुर्वीच चोरट्यांनी ही सर्व रक्कम पळवली.
महामार्गालगत असलेली इंडसइंड बँकेची मलकापूर-कराड शाखा चोरट्यांनी फोडली. कटावणीच्या सहाय्याने शटरची कुलपे तोडून त्यांनी आत प्रवेश केला. कार्यालयातील सर्व ड्राव्हर्स व कपाटे फोडून त्यांनी हाताला काय लागतय का पाहिले. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे स्पष्ट झाले. कारण बँकेच्या शाखेत कोणतीही रोख रक्कम ठेवत नसल्याचे शाखाधिकार्याने पोलिसांना सांगितले. बँक आहे पण पैसा नाही, हे लक्षात आल्याने चोरट्यांनी शेजारच्या बिल्डर्सच्या कार्यालयात डल्ला मारण्याचे ठरविले. देसाई बिल्डर्सच्या कार्यालयातही चोरट्यांनी इंडसइंड बँकेच्या शाखेप्रमाणेच कुलपे तोडून आत प्रवेश केला व सर्व ड्राव्हर्स व कपाटे फोडून सुमारे सहा लाखांची रक्कम पळवली.
देसाई यांच्या कार्यालयात सी.सी.टी.व्ही. यंत्रणा असतानाही काही तांत्रीक अडचणामुळे ती यंत्रणा नेमकी दोन दिवस बंद होती. तर इंडसइंड बँकेच्या शाखेत सी.सी.टी.व्ही. यंत्रणेसाठीचे सर्व साहित्य आणले मात्र जोडायचे राहिल्याचे सांगितले. सीसीटीव्ही फुटेज मिळाले असते तर तपासकामात चांगली मदत झाली असती असे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. मात्र परिसरातील अनेक ठिकाणच्या सीसीटीव्हीत काही संशयास्पद हालचाल सापडते का? याचाही पोलिस शोध घेत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |