अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काय होईल, हे सांगता येत नाही. आता उपकुलसचिव पदावरील ईश्वर मंझांना नौकरीला लावुन देतो, म्हणून फसवणूक करून 27 लाख रूपयांना लुबडल्या प्रकरणी अटक केली आहे. वास्तविक विद्यापीठातील उपकुलसचिवपदावरील कुणालाही नौकरीलाच काय पण कंत्राटी कामावरही घेऊ शकत नाही. मग काय आहे खरा प्रकरण?
तर सगळे व्यवस्थित झाल्यानंतर म्हणजे निलंबित ईश्वर मंझांना पुन्हा नौकरीवर घेतल्यावर विद्यापीठातील ज्या ‘विद्यार्थी नेत्याने’ त्यांनी निलंबित करण्यासाठी खटाटोप केला. त्याच विद्यार्थी नेत्याने ही ‘पोलिस केस’ तक्रारीत ‘फिट्ट’ बसविण्याचा घाट घातला. मिळालेल्या माहीतीनुसार या पुर्वी पोलिसांना जी तक्रार ईश्वर मंझांच्याविरोधात दिली होती. त्यामध्ये तक्रार करणाऱ्यांने त्यांना 27 लाख रूपये उधारीत दिले होते. ज्याने ते पैसे दिले, त्याला उपकुलसचिवपद खुप मोठे आणि भरघोस पगाराची वाटली, म्हणून त्याने पैसे देतांना फारसा विचार केला नाही. त्याच काळात मंझाचे गुण वाढ प्रकरण त्या विद्यार्थी नेत्याने बाहेर काढले होते.
त्या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केले. त्याच्या चौकशी समितीचा अहवाल मंझाने ‘मॅनेज’ केला. पण ‘त्या’ विद्यार्थी नेत्याच्या हट्टापायी मंझांना पुन्हा विद्यापीठात ‘एन्ट्री’ मिळत नव्हती. ती ‘एन्ट्री’ मंझाने ‘मॅनेज’ केली. थोडक्यात हा प्रकार त्या विद्यार्थी नेत्याला चेक देण्यासारखा वाटला. पण त्या हुशार विद्यार्थी नेत्याने शक्कल लढविली अन् मंझाच्या विरोधातली तक्रार फिरवली आणि त्या विद्यार्थी नेत्याने त्या तक्रारदाराला गाठले. त्याला ती तक्रार गून्ह्याच्या स्वरूपात ‘फिट्ट’ बसविण्यासाठी नोकरीच्या अमिषाचे कारण पुढे केले गेले. पोलिसांनी उपकुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्या कुणाला नोकरीला लावण्याचे अधिकार आहेत किंवा नाहीत, याची शहनिशा करणे गरजेचे होते. पण तसे न करता त्या विद्यार्थी नेत्याच्या दबावाला पोलिस बळी पडले आणि प्रसार माध्यमांनाही दिवसभर चालवायला बातमी मिळाली. ही केस कोर्टात ‘स्टॅण्ड’ होत नाही. याचा अंदाज विद्यापीठात असणाऱ्या ‘मंझा (हितचिंतक) परीवाराला’ही आहे. पण विद्यापीठात जे प्रशासकीय राजकारण सुरू आहे, त्यातुन हा सगळा प्रकार घडला.
आता मुळ प्रश्न 27 लाख आणि अघोरी विद्या
विद्यापीठात मंझा परिवार आहे. एक दोन नाही तब्बल तीन जण आहेत. जे विद्यापीठाच्या प्रशासकीय राजकारणात ‘सख्खे’ असुनही एकमेकांच्यासमोर आहेत. या समोर आलेल्या आपल्यांना आणि त्रास देणाऱ्या विद्यार्थी नेत्याला चेक देण्यासाठी मंझा अघोरी विद्येच्या मागे लागले. त्या विद्येच्या माध्यमातुन आपला त्रास स्वकियांचा आणि परकियांचा दुर होईल, असे वाटले होते. त्यासाठी त्यांनी पैसे घेतले पण झाले काही वेगळेच. ही आहे ‘रियल मंझा स्टोरी’ .
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |