02:33pm | Sep 09, 2019 |
बेळगाव : सतत मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाला समजावल्याने तसेच वडील मोबाईल घेण्यासाठी पैसे देत नसल्याच्या रागातून चिडलेल्या मुलाने वडिलांचा निर्घृण खून केला. त्याने वडिलांचे शिर धडावेगळे केले, तर उजवा पाय कापून बाजूला ठेवला.
शंकऱ्याप्पा रेवप्पा कुंभार (६१, सिद्धेश्वर गल्ली, काकती) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्यांचा मुलगा रघुवीर कुंभार (वय २१) याला अटक केली आहे. मृत वृद्ध तीन महिन्यांपूर्वीच जिल्हा सशस्त्र दलातून निवृत्त झाले होते.
याबाबत, घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रघुवीर हा मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. त्याला मोबाईलचे प्रचंड वेड असून तो सतत मोबाईल घेऊन बसायचा. यामुळे वडिलांनी त्याला अनेकदा समज दिली. तो सतत पब-जी गेम खेळत होता. शिवाय वडिलांकडे नवीन मोबाईलसाठी पैसेदेखील मागत होता. परंतु, वडील देत नसल्याने तो चिडचिड करत होता. याच रागातून रघुवीरने रविवारी शेजारील घरांच्या खिडक्यांवर दगडफेक केली होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेले होते.
रविवारी रात्री घरी आल्यानंतर बाराच्या सुमारास मुलगा पुन्हा मोबाईल मध्ये मग्न झाला. हे पाहून वडिलांनी त्याला पुन्हा फैलावर घेतले. याचाच राग धरून मुलाने आज पहाटे आई महादेवी यांना एका खोलीत कोंडले. वडिलांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वडील त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असताना त्याने वडिलांच्या गळ्याला धरत ढकलून खाली पाडले. यानंतर, घरातील विळीने त्यांच्या गळ्यावर वार केला. क्रूर बनलेल्या मुलाने नंतर वडिलांचे शीर धडावेगळे केलेच. शिवाय त्यांचा उजवा पायदेखील कापून बाजूला ठेवला. यानंतर कोंडलेल्या आईला बाहेर काढून केलेला प्रकार दाखवला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे एसीपी शिवा रेड्डी, काकतीचे निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचे चित्र अंगावर शहारे आणणारे होते. पोलिसांनी सदर मुलाला ताब्यात घेतले असून काकती ठाण्यात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |