02:30am | Dec 11, 2019 |
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील लक्षवेधी असणाऱ्या शिरवळ ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच लक्ष्मी सागर पानसरे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व इतर अशा तेरा सदस्यांनी खंडाळा तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान,अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी,शिवसेना सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहे.
शिरवळ ता.खंडाळा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नोव्हेंबर २०१७ रोजी होऊन आरक्षणानुसार सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षण असल्याने पहिल्या लोकनियुक्त सरपंच म्हणून भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मी सागर पानसरे यांनी बाजी मारली होती तर त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे दिलीप गुंजवटे हे उपसरपंचपदी विराजमान झाले होते. यावेळी गेल्या ३० महिन्यांच्या कालावधीमध्ये लक्ष्मी पानसरे यांनी मनमानी कारभार सुरु केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने होत होता. यावेळी घडलेल्या घडामोडीनंतर अचानकपणे दिलीप गुंजवटे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील देशमुख यांनी उपसरपंचपदी बाजी मारत सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्या गटाकडे असलेले एक जादा मत घेऊन विराजमान झाले .तरीही भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याविरुद्ध सतत आक्रोश वाढत गेला. त्यांच्या मनमानी कारभाराने स्वपक्षीय नाराज होत विकासकामांना खीळ पडल्याचा आरोप स्वकीयांसह विरोधी ग्रामपंचायत सदस्यांकडून होत होते. त्यामुळे या कारभाराला कंटाळून शिरवळ उपसरपंच सुनील देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे ,ममता पिसाळ, संगीता निगडे,दत्तात्रय रांगोळे, विकास तांबे, सचिन राऊत, रिजवाना काझी, प्रकाश परखंदे,मंगल क्षीरसागर, आशा कारळे यांच्यासह सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यासोबत सुरवातीपासून किल्ला लढवणाऱ्या शिवसेना शिरवळ शहरप्रमुख विजय गिरे यांच्या पत्नी रुपाली गिरे, ज्योती चव्हाण यांनीही अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने सह्या केल्याने व तहसीलदार खंडाळा यांच्या कार्यालयात उपस्थित राहिल्याने शिरवळमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान,अविश्वास प्रस्तावावर खंडाळा तहसीलदार तथा अध्याशी अधिकारी दशरथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली शिरवळ ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी सोमवारी दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन केले आहे.यावेळी राष्ट्रवादी ,शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर रवाना झाले आहे. या अचानकपणे घडल्या घटनेमुळे शिरवळसह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |