03:05pm | Apr 15, 2018 |
सातारा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2017-18 मधील मंजूर कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करा. जे अधिकारी निर्धारीत वेळेत काम करणार नाहीत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.
जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (महसूल) संजय पाटील, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, स्वाती देशमुख-पाटील, किर्ती नलवडे, श्रीरंग तांबे, अस्मिता मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सन 2017-18 मधील जलयुक्त शिवार अभियानांतील कामे सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या. प्रशासकीय मान्यतेशिवाय कुठलेही जलयुक्तचे काम सुरु करु नका. यासाठी पहिल्यांदा जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घ्या. सन 2017-18 मधील मंजूर सर्व कामे तात्काळ सुरु करा. जेथे काम करण्याच्या अडचणी येत आहेत त्या मला सांगा, निश्चीत अडचणी सोडविल्या जातील. कृषी विभागाने एक व्हॉट्सअप चा ग्रुप तयार करुन सुरु असलेल्या कामांच्या प्रगतीची माहिती रोजच्या रोज द्यावी.
यांत्रिकी विभागाने अंदाजपत्रके तयार करुनच कामे करावीत. सर्व प्रांतांनी जलयुक्तच्या कामांसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढवावा. जलयुक्तच्या कामांसाठी खासगी यंत्रांचा वापर करावा. यासाठी डिझेल देण्याची व्यवस्था केली जाईल. मी येत्या काही दिवसात प्रत्येक तालुक्याला भेट देवून जलयुक्तच्या कामांची पाहणी करणार आहे.
सन 2018-19 मध्ये ज्या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करण्यात आला आहे, अशा गावांमध्ये शिवार फेरी काढून 15 दिवसांच्या आत कामांचे आराखडे निश्चित करा. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी दिल्या.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |