05:44pm | Jun 21, 2019 |
सातारा : आपल्या जीवन शैलीमुळे आयुष्यमान कमी होत चालले आहे. निरोगी आयुष्यासाठी व आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगासने केला पाहिजे, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज केले.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील आयुष विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी उपस्थित होते.
शक्ती आणि युक्तीची सांगड घातली तर माणूस निरोगी राहू शकतो व निरोगी आयुष्यामुळे ठरवलेले ध्येय गाठू शकतो यासाठी प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करावी, असे सांगून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रत्येकाने दिवसाची सुरुवात ही व्यायामाने केली पाहिजे. कमीत कमी दररोज 20 मिनिटे रोज चालण्याचा व्यायाम तरी केला पाहिजे. शारिरीक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग केला पाहिजे. यामुळे ताण-ताणव तर कमीच होतोच आपले आरोग्यही चांगल्या पद्धतीने राहते. मुलांनी अभ्यासाबरोबर शारिरीक व्यायामालाही महत्व दिले पाहिजे. योगामुळे मानसिक विकास होते. यासाठी प्रत्येकाने योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा, असे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध योगा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित योगाची आसने करण्यात आली. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |