12:19am | May 14, 2019 |
कराड : कराड-घाटमाथा दरम्यानच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे रस्त्याकडेच्या गावांना धुळीच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. सुमारे एक महिन्यापासून वसंतगड ते कराड आरटीओ कार्यालय या दरम्यानच्या रस्त्यावर पाणी न मारल्याने संतप्त झालेल्या आबईचीवाडी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी 11 वाजता वाहतूक रोखून धरली. त्यामुळे वसंतगड ते आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अखेर पोलीस अधिकारी आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकार्यांनी घटनास्थळी येऊन आबईचीवाडी ग्रामस्थांशी चर्चा केली. दिवसातून सहा वेळा टँकरने पाणी मारण्याची ग्वाही दिल्यानंतर आबईचीवाडी ग्रामस्थांनी रोखलेली वाहतूक पूर्ववत झाली.
विजापूर-गुहागर राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या मार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाली. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामात सलगता आणि नियमितता नाही. परिणामी अनेक ठिकाणचे काम अर्धवट अवस्थेत आहे. तसेच काही रस्ता खोदण्यात आला आहे, तर काही ठिकाणी मातीचे थर टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. सपाटीकरण पूर्ण झालेल्या ठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. या सर्व गदारोळात कराड ते पाटण दरम्यान रस्त्यावर धुळीचे सामा्रज्य निर्माण झाले आहे. अवजड वाहन गेले की धुळीचे लोट उठतात. अशा वातावरणामुळे रस्त्याकडेला असणार्या गावांतील लोकांना धुळीचा मोठा त्रास होत आहे. दुचाकी, तीन चाकी वाहनधारकांना तोंडाला रूमाल बांधूनच प्रवास करावा लागत आहे. त्यातच रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे वाहने घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. रस्त्यावरील धुळीचा त्रास कमी व्हावा, यासाठी टँकरने पाणी मारण्यासाठी अनेकदा रस्त्याकडेच्या गावांतील लोकांनी कामाचा ठेका असलेल्या एल अँड टी कंपनीच्या अधिकार्यांना धारेवर धरले होते. त्यामुळे तांबवे फाटा, साकुर्डी, वसंतगडपर्यंत टँकरने पाणी मारण्यात येत होते. मात्र, तेथील काँक्रीटीकरणाचे काम संपल्यानंतर वसंतगड ते आरटीओ कार्यालय, या टप्प्यातील रस्त्यावर पाणी मारणे बंद केले. त्यामुळे महिनाभरपासून आबईचीवाडी, सुपने गावाच्या नागरीक धुळीच्या त्रासाने वैतागले होते. ठेकेदार कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणीही अधिकारी फिरकला नव्हता. यामुळे संतप्त झालेल्या आबईचीवाडी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी वाहतूक रोखून धरली. रस्त्याकडेच्या गटारांच्या काँक्रीटीकरणासाठी आणलेल्या लोखंडी प्लेटा रस्त्यात आडव्या टाकण्यात आल्या. त्यामुळे एकही वाहने पुढे जाऊ शकत नव्हते. या आंदोलनात आबईचीवाडीतील अबालवृध्द सहभागी झाले होते. युवती आणि महिलांचाही त्यात समावेश होता.
आबईचीवाडी ग्रामस्थांनी वाहतूक रोखून धरल्याची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, उपनिरीक्षक अशोक भापकर, हवालदार जगदाळे हे घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी त्यांच्या समोर धुळीचा होणारा त्रास आणि सुमारे महिन्यापासून ठेकेदार कंपनीने टँकरने पाणी मारणे बंद केल्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर एल अँड टी कंपनीचे अधिकारी शिंदे हेही घटनास्थळी पोहोचले. त्यांनाही ग्रामस्थांनी धारेवर धरले. अखेर आबईचीवाडीकरांसमोर नमते घेत शिंदे यांनी दिवसातून सहा वेळा टँकरने पाणी मारण्याची सूचना केली. तसेच या पट्ट्यातील काम गतीने पूर्ण करण्याची ग्वाहीही दिली. त्यानंतर तासाभराने कराड-पाटण मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |