05:23pm | Feb 07, 2019 |
फलटण : गिरवी, ता. फलटण येथील अवैध दारु विक्रेत्यांनी गेल्या काही वर्षांपासून उच्छाद मांडलेला आहे. कोणताही परवाना नसताना फलटण ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे खुलेआम हजारो रुपयांची दारु दरराजे विकली जात असल्यामुळे गिरवीतील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे. या अवैध दारु विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गिरवीतील सुमारे दीडशे महिलांनी फलटण तहसिलदारांकडे केलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात शंभर टक्के दारुबंदी आहे. ही दारुबंदी त्या तालुक्यातील रणरागिणींच्या व व्यसनमुक्ती संघाचे विलासबाबा जवळ यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाली. मात्र फलटण तालुक्यातील पुढार्यांच्या व स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या गिरवी या गावामध्ये चोवीस तास दारुची विक्री केली जात आहे. मात्र याकडे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील बिट अंमलदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. यापूर्वी गिरवी गावातील ग्रामस्थ व महिलांनी ही अवैध दारु विक्री बंद व्हावी यासाठी अनेक तक्रारअर्जसुद्धा केलेले आहेत. मात्र संबंधित यंत्रणेने या अवैध दारुविक्रीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या दारुविक्रीमुळे शाळेतील लहान मुले-मुली, महिला यांना या तळीरामांमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावातील अनेक तरुण मुले रोजंदारीवर कामाला जातात. मात्र काम केलेला पैसा ते या दारुतच घालवित असल्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
संपूर्ण गिरवी गावातच या अवैध दारुमुळे व्यसनाधिनता वाढलेली आहे. तसेच अनेक वर्षांपासून अवैध दारुविक्री करणारे मात्र आर्थिकदृष्ट्या सधन झाले आहेत. या पैशाच्या जोरावरच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील गिरवी बिट अंमलदाराला मात्र दर आठवड्याला ठरलेला हप्ता मिळत असल्यामुळे बिट अंमलदार पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारीच पोहोचू देत नाही. त्यामुळे आतापर्यंत गिरवीतील अवैध दारुविक्रेत्यांवर मोठी कारवाई झालीच नाही. जुजबी कारवाया करुन दारुविक्रेत्यांना सोडून दिल्यामुळे या अवैध दारुविक्रेत्यांचे धाडस वाढलेले आहे. मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या व्यसनाधिनतेमुळे सामाजिक वातावरण दूषित झाले आहे. त्यामुळे त्याअनुषंगाने भांडणतंटे, मारामार्या नित्याच्याच झाल्या आहेत. या विरोधात गिरवी गावातील सजग महिलांनी एकत्र येवून अवैध दारुविक्रेत्यांच्या विरोधात एल्गार पुकारुन या अवैध दारुविक्रेत्यांच्या मुसक्या लवकरात लवकर आवळाव्यात यासाठी फलटण तहसिलदार तसेच गिरवीच्या सरपंचांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांनी लक्ष घालून गिरवी गावातील अवैध दारुविक्री त्वरित मोडित काढून संबंधित दारुविक्रेत्यांवर चाप बसविण्याची मागणी गिरवीतील महिलांनी केली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |