04:46pm | Dec 18, 2018 |
बिजवडी : माण - खटाव या दुष्काळी तालुक्याच्या शिवारात पाणी आणत दुष्काळ हटवण्यासाठी आपण राजकारणात आलो असून उरमोडीच्या पाण्याने यातील पहिला टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे आज दुष्काळी परिस्थितीतही अनेक गावांतील ओढे , बंधारे वाहताना दिसून येत आहेत.आता चार वर्ष सत्ता भोगल्यानंतर निवडणूकां समोर पाहून अनेकांना उत्तर माणच्या पाणीप्रश्नाचा कळवळा आल्याचे दिसून येतोय.उरमोडीच्या वेळीही अशीच अवस्था होती पण मतदारसंघातील जनतेला आपण एक शब्द दिला होता की साडेतीन वर्षात उरमोडीचे पाणी आणून दाखवणार नाहीतर आमदारकीचा राजीनामा देणार तो शब्द आपण पूर्ण करून दाखवलाय.तसाच शब्द आज या उत्तर माणच्या जनतेला देत आहे. या भागात जिहे - कटापूरचे पाणी आणणारच असे प्रतिपादन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे.
वावरहिरे ता.माण येथे आगामी निवडणूकांच्या पाश्वर्वभूमीवर संघटनात्मक बांधणी तसेच जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी माण विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचा गणनिहाय मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य अरूण गोेरे , माण-खटाव युवक कॉग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब काळे ,सोमनाथ भोसले ,माजी जि.प.सदस्य अर्जुन काळे ,हरिभाऊ जगदाळे ,माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब हुलगे ,रमेश कदम ,विठ्ठलराव भोसले ,सिध्दार्थ गुंडगे ,करण पोेरे , साहेबराव भगत , डॉ.अतुल बंदुके , सरपंच चंद्रकांत वाघ ,आनंदराव देवकर , राजाराम बोराटे आदी मान्यवर व वावरहिरे गणातील विविध गावचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले ,या भागाला जिहे कटापूरमधून तीन टीएमसी पाणी मिळू शकते.मात्र त्यासाठी शिरवलीचा तीन किमी.चा बोगदा पूर्ण व्हायला पाहिजे त्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. अगोदर ते पाणी आंधळी धरणात आणावे लागेल.मगच ते पाणी आंधळीतून लिफ्टने उचलून ग्रँव्यूटीने या भागाला द्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणूका जवळ आल्या आहेत.एखाद्या वेळेस याबरोबरच विधानसभेचीही निवडणूक लागू शकते. विकासकामाच्या बाबतीत सर्वच गावांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय.आपण पाच वर्षे जनतेची सेवा करत असतानाही शेवटच्या दोन तीन दिवसात सर्व विसरले जात आहे.आपल्या गावात विकासकामासाठी जसे मागे लागता तसेच निवडणूकीदरम्यान निस्वार्थीपणे पाठीशी रहा असे आवाहनही त्यांनी केले.
कर्जमाफीची अवस्था ,गँस ,पेट्रोल दरवाढ आदीप्रकारे हे भाजप सरकार जनतेची लूटमार करत आहे.पाच राज्यात जसा भाजपचा सुफडासाफ झालाय तशीच त्यांची अवस्था महाराष्ट्रात होणार असल्याचेही आमदार गोरे यांनी सांगितले.
जि.प.सदस्य अरूण गोरे म्हणाले , मी या गटातला नसतानाही फक्त भाऊंच्या शब्दावर मला तुम्ही निवडून दिले आहे.तो विश्वास नक्कीच सार्थकी लावेन.उत्तर माणच्या या भागाला फक्त पाणीदार आमदार गोरे भाऊच पाणी देऊ शकतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अर्जुन काळे ,बाबासो हुलगे , रमेश कदम ,चंद्रकांत वाघ , राजाराम बोराटे आदींनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन दिगंबर राजगे यांनी करून आभार चंद्रकांत वाघ यांनी मानले.
पाण्याच्या बदल्यात खारघरला दोन एकर जमीन....
उत्तर माणच्या भागाला धोमबलकवडीचे पाणी आरक्षित होते.स्व.पोळ तात्यांच्या मार्डी गावातून हे पाणी जाणार होते.त्या पाण्यावर आपला हक्क असताना त्यावेळच्या लोकप्रतिनीधीच्या संमतीने हे पाणी घाटाखाली नेण्यात आले. त्याबदल्यात दोन एकर जमीन खारघरला मिळाली.आज त्यांची पोरं त्या जमीनीचे भाडे खात आहेत तर जनता पाण्यासाठी व्याकूळ होऊन बसली आहे.
चोरगांवकरांनी मायणीचा पाण्याचा प्रश्न सोडवावा...
मायणीत स्व.गुदगे वीस वर्षे तर हे चोरगांवकर पाच वर्षे आमदार असताना मायणीचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडवू शकले नाहीत.अने हे आपल्याला पाणी देण्याची भाषा करत आहेत.त्यांनी अगोदर मायणीच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा. अनिल देसाईंचा समाचार घेताना आमदार गोरे म्हणाले ,जिथ लग्न असेल तिथ पिपाणी वाजणारच. याअगोदर आघाडीची सत्ता होती तिथे हे दोघेही राष्ट्रवादीत होते.आता भाजपची सत्ता आहे लगेच भाजपमध्ये गेले.जिथे सत्ता तिथे हे अशी यांची अवस्था आहे. माझ्याविरोधात लढण्याची यातील एकाची ही क्षमता नाही.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |