सातारा : कोरेगाव रोडवर दि. 6 जानेवारी 2016 रोजी ट्रक चालक आरोपी उदय भाऊसाहेब राठोड (वय 27, क्षेत्रमाहुली, ता. सातारा) याने बेदरकार गाडी चालवल्याने दुचाकीवरील दोघे ठार झाले होते. याचबरोबर त्याने एसटीलाही धडक दिली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधिश मोरे यांनी सहा महिने सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी दि. 6 जानेवारी रोजी संगम माहुली येथे कृष्णा पुलाच्या वळणावर उदय राठोड याने भरधाव वेगाने ट्रक चालवला. यामुळे त्याची दुचाकीला धडक बसल्याने संतोष चव्हाण व मधुरा शिर्के हे ठार झाले. तर तक्रारदार जितेंद्र तांदळे यांच्या एसटीलाही धडक दिल्याने त्यातील सहा प्रवासी जखमी झाले होते.
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि मयुर वैरागकर यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात दोन्ही पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद केला. सरकार पक्षाच्यावतीने ड. महेश शिंदे यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी आरोपी उदय राठोड याला शिक्षा ठोठावली. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अविनाश पवार, क्रांती निकम, रवी जाधव यांनी सहकार्य केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |