04:33pm | Jul 12, 2019 |
सातारा : कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. पुर्नवसनासह पुनर्वसनाच्या ठिकाणी घर, प्लॉट मिळाला पाहिजे. यासह इतर काही प्रमुख आणि रास्त मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या असून या सर्व मागण्या तातडीने पुर्ण करा. प्रकल्पग्रस्तांना भेडसावणार्या समस्या त्वरीत सोडवा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वन विभागाच्या अधिकार्यांना केल्या.
जावली तालुक्यातील खिरखंडी, आडोशी, माडोशी, रवंदी, कुसापूर आदी गावे कोयना अभयारण्य क्षेत्रात येतात. या गावातील 54 प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे वन विभागाच्या अधिकार्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. बैठकीला कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पवार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक (कोल्हापूर) डॉ. विनिता व्यास, सहायक वनसंरक्ष (वन्यजीव) सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल (ङ्गिरते पथक) श्रीमती ज्योती घोरपडे, मेट इंदोली वनपाल (वन्यजीव) योगेश गावित यांच्यासह तानाजी जाधव, अशोक जाधव, आनंद कदम, सीताराम जाधव, एकनाथ जाधव, नारायण जाधव आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
सदर 54 खातेदारांना पुर्नवसनाच्या ठिकाणी घरप्लॉट मिळावेत. 2019 पर्यंत 18 वर्ष पुर्ण असणार्या प्रकल्पग्रस्तांना वयोमर्यादा वाढवून तसा शासन निर्णय करण्यात यावा. तसेच त्यांना घरप्लॉट मिळावा आणि पर्यायी जमीन देण्यात यावी. 18 वर्ष पुर्ण झालेल्या खातेदारांना शासकीय नोकरी मिळावी तसेच त्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा. याशिवाय या खातेदारांना प्राधान्याने वन विभागामध्ये नोकरी मिळावी. तसेच ज्या खातेदारांचे अद्याप पुनर्वनस झालेले नाही त्यांना लॉंच प्रवासाची सवलत देण्यात यावी आदी मागण्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकार्यांना केल्या. आमच्या अखत्यारित बाबींची तातडीने पुर्तता केली जाईल आणि वरिष्ठ पातळीवरील मागण्यांबाबत वरिष्ठांना लेखी स्वरुपात कळवून योग्य तो मार्ग काढला जाईल, असे डॉ. व्यास यांनी यावेळी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |