02:23am | Jan 24, 2020 |
कण्हेर : आकले ता. सातारा येथे अल्पवयीन मुलीने पित्याचा गळा आवळून खून केला. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून प्रियकराच्या मदतीने तिने हे कृत्य केले. दोघेही संशयित अल्पवयीन असून जन्मदात्या बापाचाच खून केल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी 3 तासातच घटनेचा छडा लावून प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले.
मृत व्यक्ती 45 वर्षाची आहे. ते मोलमजुरी करून कुटुंबाचे पालन पोषण करत होते. त्यांची पत्नी गेल्या पंधरा वर्षांपासून बेपत्ता असून मुली व मुलासमवेत ते राहत होते. मुलगा दोन दिवसांपूर्वीच कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी गेला आहे. बुधवारी मध्यरात्री ते घरी आले. त्यानंतर ते झोपी गेले होते तर पहाटेच्या सुमारास खुनाचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लगोलग कसून तपासाला सुरूवात झाली व अवघ्या तीन तासातच या खुनाचा उलगडा झाला. अल्पवयीन मुलीनेच हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले. या मुलीचे वस्तीतीलच एका अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे हा मुलगा वारंवार घरी येत होता. ही बाब मुलीच्या वडीलांना खटकत होती. त्यातूनच मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बुधवारी मध्यरात्रीनंतर गळा आवळून पित्याचा खून केला. रात्री 2 च्या सुमारास मुलीने स्वतःच्या काकांना वडील झोपेतून उठत नसल्याची खबर दिली. नातेवाईकांना घटना शंकास्पद वाटल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |