09:53pm | Jul 18, 2019 |
कोरेगाव : तांदुळवाडी ता.कोरेगाव येथील भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख राजेंद्र मतकर यांचेवर झालेला हल्ला हा राजकिय द्वेषातून झाला असून या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो असे मत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला.पोलिसांनी राजेंद्र मतकर यांचा जबाब घेऊन या गुन्ह्याची फेरतपासणी करावी अशी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
रमेश उबाळे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी राजेंद्र मतकर व त्यांचे चुलत बंधू यांचेवर तांदुळवाडी येथिल मारुती मंदिरात भ्याड हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला पूर्वनियोजित असून राजेंद्र मतकर यांना राजकारण करण्यापासून रोखण्यासाठीच केला आहे. राजेंद्र मतकर सैन्यदलातुन नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत परंतु त्यांनी अनेकवर्षे केलेली देशसेवा विसरता येत नाही. राजेंद्र मतकर यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेविषयी नितांत आदर व प्रेम आहे. नरेंद्र मोदी यांचे देशप्रेम, पारदर्शक केलेला कारभार पाहून त्यांनी राजकारणात काम करण्याचे निश्चित करून भारतीय जनता पार्टीचा काम करण्याचा निर्णय घेतल्यानतंर त्यांना पक्षाने तांदुळवाडी येथे प्रमुखाची जबाबदारी दिली आहे.लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप-सशिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे केलेले काम अनेकांच्या डोळ्यात खुपले त्यांना आता राजकारणापासून कसे रोखायचे? असा अनेकांना प्रश्न पडल्याने त्यांच्यावर हा भ्याड हल्ला झाला आहे.राजेंद्र मतकर यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे हे अनेकांना सहन झाले नाही. असे मत व्यक्त करून रमेश उबाळे व उपस्थित कार्यकेत्यानी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
राजेंद्र मतकर हे निर्व्यसनी, निस्वार्थी स्वच्छ चारित्र्य असलेले व्यक्तिमत्व आहे त्यांना असेच काम करू दिल्यास आपले राजकारण धोक्यात येईल, आपले राजकीय महत्व कमी होईल अशी भीती अनेकांना आता वाटू लागली आहे. म्हणूनच त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. असे सांगून उबाळे म्हणाले, वास्तविक पोलिसांनी राजेंद्र मतकर यांचा जबाब घेऊनच एफआयआर नोंदवायला हवी होती परंतु तसे घडले नाही. पोलिसांनी राजेंद्र मतकर यांचा जबाब घेऊन या गुन्ह्याची फेरतपासणी करावी अशी आमची मागणी आहे. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे, कोरेगाव तालुकाध्यक्ष निलेश यादव, शहराध्यक्ष श्रीकांत बर्गे,किरण काटकर, बाळू चव्हाण, विक्रम माने आदी भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
गुंड प्रवृत्तीचा बंदोबस्त करू
भारतीय जनता पार्टी कोरेगाव मतदार संघात विकासाचे व विचाराचे राजकारण करत आहे त्यामुळे पक्षाचे लोकमत वाढत आहे हे सहन होत नसल्याने गुंड प्रवृत्ती मतदारसंघात उफाळून आली असून लक्षात ठेवा देशात, राज्यात आमची सत्ता आहे. या गुंड प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची शक्ती आमच्यात आहे. असा इशाराही रमेश उबाळे यांनी दिला.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |