08:32pm | Apr 25, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील एका नामवंत सामाजिक संस्थेने (फौंडेशन) सातारा नगरपालिकेला दिलेली दोन ट्रक अन्नधान्याची (किट) मदत केवळ दीड दिवसांमध्ये संपल्याने दोन ट्रक मदतीला फुटले कुठे पाय? अशी चर्चा सातारा पालिकेच्या वर्तुळात सुरू झाली आहे. या घटनेमुळे काही नगरसेवक अचंबित झाले असून या घटनेमुळे कुंपणच शेत खात असल्याच्या चर्चेला चांगलेच खत-पाणी मिळू लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या आपत्कालीन बैठकीला मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी कोलदांडा घातल्यामुळे त्यांच्या या भूमिकेबाबत संशय कल्लोळ निर्माण झाला आहे. या बैठकीमध्ये सातारा नगरपालिकेला मिळणारी मदत आणि त्याचे वाटप यावर ऊहापोह होणार होता हे विशेष.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनासदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे २३ मार्च रोजी जिल्ह्यात संचारबंदी जारी करण्यात आली. अत्यावश्यक बाबी वगळता कंपन्या, उद्योग - व्यवसाय यांना टाळेबंदी लागली. सातारा शहरातील बहुतांश वर्ग औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरी करून आपली गुजरान करतो. काहीजण शहरासह उपनगरात रोजंदारीची कामे करून आपल्या कुटुंबाची भूक भागवतात. संचार बंदीमुळे या सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती, त्यातच कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे संचारबंदी वाढवण्यात आल्यामुळे अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न गहन झाला होता. बँकेतील बँक बॅलन्ससह घरातील अन्नधान्य, संसार उपयोगी साहित्य संपल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी जिल्हा प्रशासनाने गरजू असणाऱ्या नागरिकांना अन्नधान्याच्या स्वरूपात किट वाटण्यास सुरुवात केली. सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्वच नगरसेवकांनी विविध संस्था संघटना आणि उद्योगपतींना आवाहन करून सातारा नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी मदत जमा करावी असे आवाहन केले. हे आवाहन करताना संबंधित पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील गरजू, गोरगरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवले होते. प्रत्यक्षात मात्र या मदतीला दुसरीकडेच पाय फुटू लागल्यामुळे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
आश्चर्य म्हणजे एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, दोनच दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील एका नामवंत सामाजिक संस्थेने सातारा पाली पालिकेकडे दोन टन म्हणजेच दोन ट्रक अन्नधान्य स्वरूपात मदत पाठवली होती. ही मदत पालिकेच्या शेजारी असणाऱ्या पालिकेच्या मालकीच्या मंगल कार्यालयात उतरून घेण्यात आली. या मदतीबाबत शुक्रवारी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पालिकेकडे केवळ तांदूळ आणि गहू अशा स्वरूपात मदत शिल्लक राहिली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ दीड दिवसात दोन ट्रक मदतीला नक्की कोठे पाय फुटले याबाबत खुद्द नगरसेवकच अचंबित झाले असून पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभार बाबत त्यांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. इतक्या सुपरफास्ट गतीने ही मदत नक्की कोणत्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली, याबाबत पालिका प्रशासनाने जनतेला स्पष्टीकरण देण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे. या घटनेच्या निमित्ताने पालिकेत कुंपणच शेत खात नाही ना याकडेही लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे.
शुक्रवारी पालिकेमध्ये मदतीसंदर्भात आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सातारा पालिकेला आलेली एकून मदत, त्या मदतीचे वाटप किती आणि कुठे झाले याबाबत आढावा घेण्यात येणार होता, या बैठकीला मुख्याधिकारी शंकर गोरे यांनाही निमंत्रण दिले होते मात्र त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संशय कल्लोळ निर्माण होण्याबरोबरच पालिकेमध्ये आता मान-अपमान अपमानाचे नाट्य रंगू लागले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |