02:16am | Mar 21, 2020 |
कराड : सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने पारित केलेल्या निर्णयानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. चव्हाण यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे 8 फेब्रुवारी 2020 च्या पत्राद्वारे सदरच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती.
आ.चव्हाण यांनी सतत मतदारसंघात चौफेर विकास करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री असताना आ. चव्हाण यांना कराड दक्षिणसाठी भरघोस निधी देण्याची संधी मिळाली. त्यातून कराड व मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांना यश आले. त्यानंतर आजदेखील ते मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची समाजमनामध्ये विकासाचा आश्वासक चेहरा अशी प्रतिमा बनली आहे. त्यांनी मागणी केल्यानुसार नुकत्याच मंजूर झालेल्या निधीमध्ये कराड दक्षिणमधील डोंगरी विभाग, वांग खोरे, हायवेलगतचा भाग, कृष्णाकाठ यासह मलकापूर विभागात निधी देऊन समतोल साधला आहे. या निधीमधून 51 गावांमधील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासनिधींच्या माध्यमातून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील गावांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तताच केली आहे.
मंजूर झालेल्या निधीतून 51 गावातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, आर. सी. सी गटार बांधणी, स्मशानभूमी सुधारणा व शेड बांधणी तसेच संरक्षक भिंत, नदीवरील घाट, बी. बी. एम कारपेट, रस्ते मुरुमीकरण व खडीकरण, रस्ते खडीकरण व डांबरीकरण, ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसचिवालय उभारणी, सामाजिक सभागृह बांधणी, पिकअप शेड बांधणे, ओढ्यावरील साकव पूल बांधणी, पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था अशा कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |