सातारा : जिहे-कठापूर योजनेचा अभियंता असलेल्या विनोद मुंजप्पा (वय 34) रा. आदित्य नगरी, खेड यांच्यावर बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गाडी आडवी मारुन चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विनोद मुंजप्पा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विनोद मुंजप्पा हे जिहे-कठापूर योजनेमध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी ते सातारा येथील सातारा क्लबमध्ये व्यायामासाठी गेले होते. व्यायाम संपवून ते आदित्य नगरी, खेड येथील त्यांच्या घरी जात असताना. त्यांची कार बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आली असता समोरुन आलेल्या दुसर्या कारने विनोद यांच्या कारला गाडी आडवी लावली. त्यानंतर विनोद गाडीतून खाली उतरल्यानंतर दुसर्या कारमधील संशयितांनी विनोद मुंजप्पा यांच्यावर धारदार शस्त्राने खूनी हल्ला चढवून सपासप वार केले. यानंतर जखमी झालेल्या विनोद मुंजप्पांनी बचावासाठी पळ काढला. त्यानंतर हल्लेखोरही घटनास्थळावरुन पसार झाले. जिहे-कठापूर योजनेच्या अभियंत्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या विनोद मुंजप्पा यांना अधिक उपचारांसाठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेत आहेत. अद्याप घटनेचे कारण समोर आले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |