सातारा: गडचिरोली वरुन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली सातारा येथे झाल्यानंतर त्यांनी आज सातारच्या माजी जिल्हाधिकारी आणि आता अतिरिक्त आयुक्त पुणे महसूल विभाग श्वेता सिंघल यांच्याकडून सातारा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतला.
प्रारंभी माजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, किर्ती नलावडे, संगीता चौगुले, अश्विनी जिरंगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते, सातारच्या तहसीलदार आशा होळर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह हे मुळचे दिल्ली येथील असून त्यांचे शिक्षणही दिल्लीत झाले. श्री. सिंह हे 2012 च्या बॅचचे आय.ए.एस. आहेत. यांनी यापूर्वी नागपूर येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम केले आहे. रामटेक जि. नागपूर येथे प्रांताधिकारी, सिंधूदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. साताऱ्याचे प्रश्न खूप आहेत. आजच मी पदभार स्वीकारला आहे. साताऱ्याचे प्रश्न मी येत्या तीन महिन्यात समजून घेणार आहे. जिल्हा प्रशासनातील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रलंबित कामाचा निपटारा टप्पाटप्प्याने सुरू करणार असल्याचे शेखर सिंग यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |