03:42am | Sep 28, 2018 |
सातारा : सातारा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत असणार्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराबाबत ‘सातारा टुडे’ने वृत्त प्रकाशित केले होते. याचा राग मनात धरुन चार महिलांनी आज संध्याकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास भ्रष्टाचाराची बातमी का प्रकाशित केली, या कारणावरुन ‘सातारा टुडे’च्या कार्यालयात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत अक्षरश: धुडगूस घातला. या प्रकरणी या चारही महिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत चालविल्या जाणार्या व्हेकेशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम (व्हीटीपी) अंतर्गत चालविल्या गेलेल्या वाईतील दोन बोगस केंद्रांचा सातारा टुडे ने पर्दाफाश केला होता. याचा राग मनात धरुन संबंधित केंद्रचालकाने मंगळवार दि. 26 रोजी भ्रमणध्वनीवरुन एका वकिलाच्या माध्यमातून आमच्या विरोधात बातमी का प्रकाशित करता, म्हणून धमकाविण्यात आले होते. हा प्रकार घडल्यानंतर दि. 27 सप्टेंबर रोजी सातारा टुडे च्या कार्यालयात चार महिला सुमारे सव्वाचारच्या सुमारास घुसल्या. तुम्ही आमच्या विरोधात बातमी का प्रसिद्ध केली, मी भाजपची पदाधिकारी आहे. तुम्ही कोणाच्या विरोधात बातम्या देताय, याची माहिती घ्यायला पाहिजे होती. तुमचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही, असे धमकावत सातारा टुडे च्या कर्मचार्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. तसेच सातारा टुडे च्या संपादकांना आम्ही सोडणार नाही, त्यांची सर्व कुंडली आम्ही काढली आहे. त्यामुळे येणार्या दिवसांत त्यांच्यावर आमच्या पद्धतीने आम्ही खोटे गुन्हे दाखल करणार आहे. त्यामुळे आमची ताकद काय आहे, ते थोड्या दिवसांत तुम्हाला कळेल, अशी धमकी संबंधित महिलांनी सातारा टुडे च्या कर्मचार्यांना दिली. तसेच कार्यालयामधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आदळआपट केली. त्यामुळे संगणकाचे नुकसान झाले आहे. ही घटना घडल्यानंतर सातारा टुडे च्या कर्मचार्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपादकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार या घडलेल्या धुडगूसाबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात या चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलांची ओळख पटविण्याचे काम सातारा पोलीस करीत असून प्रथमदर्शनी भाजपच्या दोन महिला पदाधिकार्यांची नावे समोर आली आहेत. याबाबतचा अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मछले करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज ‘सातारा टुडे’ कडे
काल दि. 27 रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास चार महिलांनी ‘सातारा टुडे’च्या कार्यालयात धुडगूस घालीत, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे सीसीटीव्ही फुटेज सातारा टुडे कडे असून या सर्व प्रकरणात भाजप पदाधिकारी कविता कचरे, स्वाती शेडगे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याची गंभीर दखल भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी घेतली असून त्यांचा या प्रकरणात सहभाग असेल तर त्यांना तत्काळ भाजपमधून निलंबित केले जाईल, अशी माहिती विक्रम पावसकर यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |