10:54pm | Jul 18, 2019 |
मसूर : वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा कराड तालुक्यातील मसूर परिसरातील जनतेला मोठा फटका बसत आहे. चुका वीज वितरण कंपनीच्या आणि ससेहोलपट मात्र वीज ग्राहकांची होत असल्याने असंतोष निर्माण झाला असून कारभारात सुधारणा न झाल्यास वीज वितरण कंपनीला वीज ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती आहे.
वेगवेगळ्या अन्यायकारक शुल्कांच्या नावाखाली कंपनीकडून वीज ग्राहकांची लूट केली जात आहे. वीज गळती, वीज चोरीला आळा घालण्याचे काम कंपनीचे आहे. वीज चोऱ्या पकडून संबंधितांकडून वापरलेल्या विजेच्या बिलाबरोबरच दंडही वसूल केला गेला पाहिजे. पण त्याचा भार प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्या ग्राहकांवरच टाकला जात असल्यामुळे हा चोर सोडून सन्याशाला फाशी देण्यातला प्रकार आहे. कंपनीच्या अशा कारभारामुळे आधीच त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांना मसूर कार्यालयातील अनागोंदीचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे.
मीटर रिडिंग घेण्याचे काम करणाऱ्या लोकांकडून नियमितपणे रिडिंग घेतले जात नाही. नियमित रिडिंग घेणे व अचूक बिले देणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी असताना ग्राहकांना चुकीची बिले दिली जातात. आलेली भरमसाठ रकमेची बिले पाहून ग्राहक चक्रावून जातात. वीज पुरवठा बंद असलेल्या ग्राहकालाही भरमसाठ रकमेची बिले देण्याचा पराक्रम मसूर कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे चव्हाट्यावर येत आहे.
यासंदर्भात खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनता मसूर कार्यालयात जाते, तेव्हा त्यांची दखल घेतली जात नाही. किंबहुना त्यांचे ऐकूनही घेतले जात नाही. उलट त्यांना उध्दट व चुकीच्या उत्तरे ऐकायला मिळतात. बील दुरूस्तीसाठी उंब्रजला जा असे सांगून त्यांना टोलवले जाते. उंब्रजला पिटाळलेल्या ग्राहकांचे कामही एका हेलपाट्यात होण्याची शाश्वती नसते. त्यांना कामधाम सोडून दिवसदिवस तेथे थांबावे लागते. त्यामुळे कंपनीने केलेल्या चुकांसाठी लोकांना का शिक्षा असा सवाल लोक विचारत आहेत. मसूर कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी हेच या चुकांना जबाबदार असताना वीज ग्राहकांची ससेहोलपट होत असल्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. लोकांच्या या तक्रारींचे तातडीने निराकरण होणे गरजेचे आहे. चुकीचे काम करणाऱ्यांवर तसेच लोकांना दुरुत्तरे देणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना वीज ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |