तासगाव : केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने अध्यादेश काढण्यात आला आहे. यानुसार सांगली जिल्ह्यात दहा हेलिपॅड तयार करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक तहसीलदार कार्यालयाने संबंधित कागदपञासह सविस्तर अहवाल तयार करुन पाठवावेत असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी दिले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे हेलिपॅड धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हेलिपॅड करण्यासाठी नियोजन करुन जागा निश्चित करावी. याचा अहवाल मुंबई येथील विमानचालन संचालनालयाच्या संचालकांना पाठवावा असा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
यानुसार सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, विटा, कडेगाव, पलूस, वाळवा आणि शिराळा या दहा ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड तयार करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलीस परेड मैदान किंवा खुले मैदान अशा ठिकाणांची पाहणी करुन जागेच्या कागदपञासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात यावा असे आदेश तहसीलदार कार्यालयांना देण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |