11:49pm | Apr 04, 2020 |
सातारा : श्वसन नलिकेत तीव्र स्वरुपाचा जंतू संसर्ग झाल्याने आज सकाळी कराड येथील कृष्णा रुग्णालयातील कोरोना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्या नऊ महिन्याच्या बाळाचा आज दुपारी उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याने कराडसह जिल्ह्यात खळबळ उडाली. संबंधित बाळाच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एनआयव्ही कडे पाठविण्यात आले असून आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत एनआयव्ही कडून रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
कोरोना (कोविड-19) विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात श्वसनसंस्थेतील तीव्र जंतूसंसर्गामुळे 24 वर्षाच्या एका युवकाला, तर कृष्णा हॉस्पिटल कराड येथे नऊ महिन्याच्या बालिकेला अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले होते. आज दुपारी बालिकेवर उपचार सुरु असताना श्वसनसंस्थेतील तीव्र जंतूसंसर्गामुळे तिचा मृत्यू झाला. अनुमानित म्हणून दाखल केलेल्या बालिकेच्या मृत्यूमुळे जिल्हा प्रशासनासह सातार्यातही खळबळ उडाली आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. संबंधित बालिकेच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनआयव्ही या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत एनआयव्ही कडून रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. तत्पूर्वी यासंदर्भात सोशल मीडियावर उलटसुलट अफवांचा ऊत आला होता. काहींनी तर कोरोना संसर्गामुळेच संबंधित बालिकेचा मृत्यू झाल्याचे जाहीर करुन टाकले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला याबाबत खुलासा करावा लागला आहे. दरम्यान, शुक्रवारी सातारा जिल्हा व खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या एकूण 5 अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून आज सकाळी श्वसनसंस्थेतील तीव्र जंतूसंसर्गामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 24 वर्षीय युवकाचा उद्या एनआयव्हीकडून रिपोर्ट प्राप्त होणार असून यानंतरच या युवकाच्या चाचणीबाबत समजणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |