दुबई : रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर रविवारी भारताने आशिया चषकातील सामन्यात पाकिस्तानवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी २३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांच्या धक्कातंत्राची टीम इंडियाला चिंता होती. मात्र, सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सुरुवातीपासून कुठलेही दडपण न घेता चौफेर फटकेबाजी केली. या दोघांनीही पाकिस्तानची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली. विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना शिखर धवन चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
मात्र, हा अपवाद वगळता पाकिस्तानचे गोलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यासमोर हतबल ठरले. रोहित शर्मा आणि धवन या दोघांनीही शतकी खेळी केली. त्यांनी सलामीच्या जोडीसाठी २१० धावांची भागीदारी रचत नवा विक्रमही प्रस्थापित केला. शिखर धवनने १०० चेंडूत ११४ धावा केल्या. तर रोहित शर्माने चेंडूत ११९ नाबाद १११ धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या अंबाती रायडूने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने संयमी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. रायडूने १८ चेंडूत १२ धावा केल्या.
तत्पूर्वी शोएब मलिकच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये २३७ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मलिकने ९० चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७८ धावांची खेळी केली. त्यामुळेच पाकिस्तानला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |