11:42pm | Apr 28, 2019 |
वाई : बनावटगिरीचे अनेक रूप आपण आपल्या अवतीभवती पहात आहोत. आणि सुशिक्षित लोकही त्याला सहज बळी पडत असतात. असंच भूलभुलै या सध्या वाई पासून जवळ पसरणी घाटात पहायला मिळत आहे, झाडावरच ताज मध असल्याचं भासवून भेसळयुक्त मध विकणारी टोळी घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळत असून हे लोक बोलबच्चन करून भेसळयुक्त मध पर्यटकांच्या माथी मारत असुन त्याची अक्षरशः लूट करीत आहेत.
उन्हाळी सुट्ट्या लागल्याने सध्या मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातुन पर्यटक पाचगणी, महाबळेश्वरला येऊ लागले आहेत. गुजरातकडील पर्यटक ही मोठ्या या दोन्हीं हिल स्टेशनवर दाखल झाले आहेत. पाचगणी, महाबळेश्वरला जाण्यासाठी वाई मार्गे पसरणी घाटातुन जावे लागते. त्यामुळे या घाटात दिवसभर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या अनेक पर्यटक घाटातून दिसणारे निसर्गाचे विहिंगम्य दृश्य टिपण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी थांबतात, याचाच फायदा घेऊन हे मध विक्रेते पर्यटकांना मधाचा पोळ दाखवून झाडावरचा ताजा मध असल्याचे भासवून औषधी मध असल्याचे सांगून मध घेण्यास भाग पाडत आहेत. तीनशे ते चारशे रुपयाने हा भेसळयुक्त मध ते पर्यटकांच्या माथी मारत आहेत. ताज मध म्हणून पर्यटक ही आनंदाने ते घेऊन जात आहेत.
पाचगणी, महाबळेश्वरला मेंप्रो, मालाज, मधुसागर या नामांकित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून बाटली बंद मध मिळत असताना केवळ पर्यटक या टोळीच्या बोलबच्चनगिरीला भाळून झाडावरच ताज मध समजून घेत आहेत. वास्तविक ही टोळी ताज, झाडावरच मध म्हणून जे मध विकतायत ते ताज, झाडावरच नसून ते साखरेचा वापर करुन हे लोक ते घरी बनवत असतात, वाईच्या उपनगरात राहणारे हे युवक मोठ्या टोपामध्ये साखर , पाणी टाकून विशिष्ट तापमाणपर्यंत तापून त्याचा पाक तयार करतात, मधाचा रंग येण्यासाठी त्यामध्ये खायचा लालसर रंग टाकला जातो. पाक थंड झाल्यावर तो मोकळ्या बिस्लरीच्या बाटल्या मध्ये भरून ठेवल्या जातात, काही पाक मोठ्या डब्ब्यात, तर काही छोट्या टोपत ठेवला जातो व त्यावर मधाचे अनेक पोळी ठेवली जातात जेणेकरून सर्व मध झाडावरचे आहे असे पहाणाऱ्याला वाटावे. शहरातील पर्यटकांना मधाविषय अधीक माहिती नसल्यामुळे ते सहजपणे बोलबच्चन करणाऱ्या टोळीच्या बोलण्यावर विश्वास ठेवण फसवणूक करून घेत आहेत. अन्न प्रशासनाच्या आखत्यारितातला हा विषय असून बरीच वर्षे या घाटात भेसळयुक्त मध विकले जात असल्याची माहिती या विभागाला समजत नाही, याविषयी उलट- सुलट चर्चा सुरू आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |