सातारा डायग्नोस्टीक सेंटर हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण
युवकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर केला हलगर्जीपणाचा आरोप
सातारा : येथील सातारा डायग्नोस्टीक सेंटर हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सांयकाळी युवकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, शहर पोलिसांनी धाव घेत सर्वांना शांततेचे आवाहन केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, स्वप्नील सत्यपान जमदाडे (वय 27, रा.शाहूनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहेे. स्वप्नील याचा गेल्या शनिवारी करंजे नाक्यावरील टीसीपीसी केंद्रासमोर अपघात झाला होता. अपघातात तो जखमी झाल्यानंतर उपचरासाठी त्याला सुरुवातीला सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी नंतर विसावा नाका येथील सातारा डायग्नोस्टीक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवस उपचार सुरु असताना स्वप्नील याच्यावर ऑपरेशन झाले. तेव्हापासून त्याला कृत्रिम श्वासोश्वास लावण्यात आला होता. नातेवाईक डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाला स्वप्नीलबाबत माहिती विचारत होते. मात्र त्यांना पुरेशी उत्तरे दिली जात नव्हती.
स्वप्नीलवरील उपचाराबाबत जमदाडे नातेवाईक सांशक असताना शुक्रवारी सकाळी पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. दुपारी मात्र अचानक स्वप्नीलचा मृत्यू झाला असल्याचे कुटुंबियांना सांगितल्यानंतर ते हादरुन गेले. अचानक स्वप्नील कसा दगावला? असा प्रश्न उपस्थित केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. रात्री उशीरापर्यंत पोलिस रुग्णालय परिसरात थांबून होते. दरम्यान, स्वप्नील याने नुकतेच किरणा दुकान सुरु केले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
सातारा डायग्नोस्टीक सेंटर हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सांयकाळी युवकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, शहर पोलिसांनी धाव घेत सर्वांना शांततेचे आवाहन केल्यानंतर