04:26pm | Oct 01, 2019 |
सातारा : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या श्री. छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांचे नाव मंगळवारी सकाळी फायनल करण्यात आले. त्यानुसार श्रीनिवास पाटील आता गुरुवार दिनांक 3 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता उदयनराजे विरोधात श्रीनिवास पाटील असा चुरशीचा सामना रंगणार आहे.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून बराच खल सुरू होता. प्रारंभी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीची ही जागा काँग्रेसला सोडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मध्यंतरीच्या काही घडामोडीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी कराडातील मेळाव्यात आपण दोन दिवसात निर्णय जाहीर करू असे म्हटले होते. पाठोपाठ काँग्रेसकडून कराड दक्षिण विधानसभेसाठी पृथ्वीराज चव्हाणांचे नाव निश्चित झाले. दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांनी मात्र लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता गुरुवारी (दि. 3) रोजी श्रीनिवास पाटील सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील अशी ही रंगतदार लढत आता पाहायला मिळणार आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |