01:45am | Feb 25, 2020 |
पुसेगाव : बुध (ता.खटाव) येथील शैलेश दिलीप सुर्यवंशी (वय ३२) यांचा येथील नेर तलावामध्ये संशयास्पद अवस्थेतील मृतदेह सोमवारी (ता.२४) आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मयत शैलेश सर्यवंशी यांचा चुलत भाऊ मंदार सर्यवंशी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शैलेश हा मांजरवाडी (ता.खटाव) येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सचिव पदावर कार्यरत होते. शनिवारी(ता.२१) सकाळी ११ च्या सुमारास वडुजला सोसायटीच्या कामासाठी जातो असे सांगून निघून गेले. त्यानंतर शैलेश सायंकाळ झाली तरी घरी परतले नाही म्हणून त्यांची पत्नी गौरी शैलेश सर्यवंशी यांनी मंदारकडे चौकशी केली. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईकांकडे, गावात व त्यांच्या सहकारी मित्रांकडे फोनवरून चौकशी करू लागले. मात्र त्यांच्याविषयी काहीच माहिती मिळू न शकल्याने सोमवारी (ता.२४) मंदार व चुलत भाऊ उदय सूर्यवंशी यांनी शैलेश हरवल्याबद्दलची तक्रार दाखल करण्यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्यात आले असता तिथे त्यांना नेर तलाव्यात पुरुष जातीचे प्रेत तरंगत असल्याचे समजले. खात्री करण्याकरिता दोघेही नेर तलाव्याकडे गेले असता सदरचे प्रेत शैलेशचेच असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |