06:15pm | Aug 25, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निकटवर्तीय सहकारी इब्राहिम उर्फ बाबुमियॉं फरास यांचे वृद्धापकाळाने सातारा येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचा दफनविधी आज शासकीय इतमामात करण्यात आला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस दलाच्यावतीने आठ जवानांकडून 24 राऊंड म्हणजेच बंदुकीच्या तीन फैरी झाडून फरास यांना मानवंदना देण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटीशांच्या विरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्यात आझाद हिंद सेना यशस्वी झाली होती. सशस्त्र, संघटित अशी ओळख आझाद हिंद सेनेची होती. ब्रिटीशांच्या विरोधात असणार्या देशांबरोबर संधान साधून आझाद हिंद सेनेने स्वातंत्र्य दृष्टिपथात आणले होते. नेताजी सुभाषचंद्र यांच्या खांद्याला खांदा लावून सातार्यामधील एक युवक आझाद हिंद सेनेमध्ये कार्यरत होता. तो युवक म्हणजे इब्राहिम उर्फ बाबुमियॉं फरास. आझाद हिंद सेनेच्या अनेक कारवायांमध्ये बाबुमियॉं यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. रासबिहारी बोस यांच्या प्रेरणेतून ते आझाद हिंद सेनेत दाखल झाले होते. कॅप्टन मोहन सिंग, कॅप्टन प्रीतम सिंग यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आझाद हिंद सेनेते काम केले. त्यांच्या सेनेतील या सक्रिय सहभागाबद्दल ब्रिटीशांनी त्यांना कैद करुन मुलदान येथील कारागृहात डांबले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रभाव होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेची बांधणी केली. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबुराव जंगम गुरुजी, सोपानराव घोरपडे, गुलाबराव फडतरे, मेहताब शेख, जगन्नाथ देशपांडे, बाबुराव मोहिते या स्वातंत्र्य चळवळीतील सहकार्यांना सोबत घेवून स्वातंत्र्य सैनिक संघटनेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या फरास यांनी सातारा येथे सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. बाबुमियॉं फरास यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचा सन्मान दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ताम्रपट व सन्मानपत्र देवून केला होता. स्वातंत्र्य चळवळीत इब्राहिम उर्फ बाबुमियॉं फरास यांचे अतुल्य योगदान राहिलेले आहे. सातारच्या राजघराण्याशी त्यांचे निकटचे व कौटुंबिक संबंध होते. काल दि. 24 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शेवटचा श्वास घेतला. आज दि. 25 रोजी गेंडामाळ येथील कब्रस्तान दफनभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
इब्राहिम उर्फ बाबुमियॉं फरास यांना पोलीस दलाच्यावतीने आठजणांकडून हवेत 24 राऊंड म्हणजेच बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |