सातारा : हैद्राबाद येथील बलात्कार्यांच्या एनकाऊन्टर नंतर देशातील पोलिसांची प्रतिमा भलतीच उंचावलेली आहे. मात्र, कधीकधी टेक्निकली भानगडीत कोण कसा अडकेल, याचा नेम नाही. परंतू सायबर गुन्हेगारांना वठणीवर आणणार्या सातारा पोलीस दलाला मात्र मुखसंकेतस्थळ असलेल्या सातारा पोलिसांच्या वेबसाईटवरच चुकीची माहिती टाकल्यामुळे मात्र अनेकांची दिशाभूल होत आहे.
साधारण दोन दिवसांपूर्वी परदेशात स्थायिक असलेल्या एका व्यक्तिने नातेवाईकाच्या अडचणीसंदर्भात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र लँडलाईन काहीवेळ व्यस्त असल्यामुळे त्यांनी सातारा पोलिसांचे संकेतस्थळ असलेल्या www.satarapolice.gov.in यावर लॉग इन करुन फलटण ग्रामीणच्या कारभार्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोबाईलवरुन सावंत नावाच्या ठाणेदारांशी त्यांचे बोलणे झाले. त्यानंतर काही दिवसांनंतर तो अनिवासी भारतीय फलटण ठाणेदारांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना अक्षरश: झटकाच बसला. कारण ज्या ठाणेदाराचा फोटो त्यांनी सातारा पोलिसांच्या संकेतस्थळावर पाहिला होता. तो ठाणेदार वेगळा व प्रत्यक्षात दिसलेला ठाणेदार वेगळा होता. त्यामुळे तो व्यक्ती बुचकळ्यात पडला. यावेळी त्यांनी फलटण ग्रामीणचे ठाणेदार यांना नाव विचारले असता त्यांनी नितीन सावंत असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात संकेतस्थळावर पी. डी. सावंत असे नमूद करण्यात आले होते. सातारा पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ खरेतर संशोधनाचा विषय आहे. रोज हजारो लोक विविध कारणांसाठी या संकेतस्थळाला भेट देत असतात. मदत कमी आणि भानगडीच जास्त अशी परिस्थिती या संकेतस्थळाबाबत जिल्ह्यातील नागरिक बोलू लागले आहेत. वास्तविक सातारा पोलिसांच्या संकेतस्थळावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून माजी पोलीस अधिकारी प्रकाश सावंत यांचा फोटो टाकण्यात आलेला आहे. तसेच त्यांचे संपूर्ण नाव पी. डी. सावंत असेही नमूद करण्यात आले आहे. सुमारे पाच ते सहावर्षापूर्वी प्रकाश सावंत हे सातारा पोलीस दलात बदलीने रुजू झाले होते. त्यांनी शिरवळ, कोरेगाव, महाबळेश्वर आणि फलटण शहर येथे सेवा बजावली होती. याचवर्षी ते महाराष्ट्र पोलीस दलातून दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मात्र सातारा पोलिसांच्या संकेतस्थळाचे काम बघणार्यांना सावंत नावातील फरक लक्षात न आल्याने त्यांनी फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्याऐवजी प्रकाश सावंत या सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याचा नाव आणि फोटो अपलोड केल्यामुळे अनेक पीडितांची यानिमित्ताने दिशाभूल होत आहे. त्यामुळे फलटण ग्रामीणचे नितीन सावंत कारभारी की, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश सावंत? याबाबत जिल्हा पोलीस दलाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |