01:10am | Jan 22, 2020 |
सातारा : साहित्याचा प्रसार गावोगावी व्हावा या भूमिकेतून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने शिवार साहित्य संमेलन ही नवीन संकल्पना राबवण्यात येत आहे. मसाप पुणे आणि मसाप शाहुपुरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी रोजी अतित येथे सायंकाळी 6 ते 8 यावेळेत प्रगतशील शेतकरी बाळासाहेब लोहार यांच्या शेतावर शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सचिन प्रभुणे यांची निवड करण्यात आल्याची माहिती मसाप शाहुपुरीचे उपाध्यक्ष अजित साळुंखे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, मसाप, पुणे यांच्यावतीने साहित्याचा प्रसार गावोगावी व्हावा यासाठी शिवार साहित्य संमेलन ही नवीन संकल्पना राबविली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मसाप, पुणे आणि मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पाच वर्षात 25 शिवार साहित्य संमेलन घेण्याचे नियोजन केले आहे. दरवर्षी पाच शिवार साहित्य संमेलन होणार आहेत. यावेळेस अतित येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब लोहार यांच्या शेतावर शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 8 यावेळेत होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सचिन प्रभुणे यांची निवड करण्यात आली आहे. सचिन प्रभुणे यांचे शिक्षण सातारा आणि वाई येथे झाले असून वाईतील प्रतिक थिएटरतर्फे नाटक आणि एकांकिकेमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी आकाशवाणीसाठी अनेक मालिका आणि मुलाखती घेतल्या आहेत. सध्या आकाशवाणीच्या किसान वाणी कार्यक्रमासाठी निर्माता म्हणून जबाबदारी पाडत आहेत. या संमेलनाचे उद्घाटन मसाप, पुणेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी कवी डॉ. सुधाकर बेंद्रे, अजित जाधव, सुहास चव्हाण, प्रमोद मोहिते हे कविता सादर करणार आहेत. यावेळी मसाप, पुणेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कृषिभूषण मनोहर साळुंखे, किशोर बेडकिहाळ, डॉ. उमेश करंबेळकर, मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |