06:46pm | Mar 31, 2020 |
सातारा : देशातील लॉक डाऊनचा सातारा जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसला असून दुधाच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. सहकारी दूध संघ, खाजगी दूध संस्था यांच्याकडे दुधाचा भरमसाठ साठा झाल्याने दोन-दोन दिवस दूध संकलन बंद करावे लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी यासारख्या उपपदार्थांची मागणी घटल्याने उपपदार्थ निर्मिती ठप्प झाली आहे. या सर्व बाबींमुळे जिल्ह्यातील दूध व्यवसायिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील अग्रेसर असलेल्या कोयना सहकारी दूध संघासह सकस, भक्ती, सुमन, सोनाई, डोंगराई, संतोष, आकाश, अजिंक्य आदी दूध संस्थांच्या दुधाची विक्री जिल्ह्यासह पुणे, मुंबई, पंढरपूर, चिपळूण, बेळगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र देशात १४ एप्रिलपर्यंत लॉक डाऊन सुरू असल्याने दूध विक्रीत मोठी घट झाली आहे. अत्यावश्यक सेवेत दुग्ध व्यवसायाचा समावेश केला असला तरी दूध संकलन नियमितपणे सुरू आहे. मात्र संकलनाच्या प्रमाणात दुधाचे वितरण होत नसल्याने कोयना दूध संघासह खासगी दूध संस्थाकडे दुधाच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्याच्या आसपास असणारे दूध पावडर प्रकल्पही दुधाची स्वीकृती करण्यास नकार देत असल्याने वारंवार दूध संकलन बंद ठेवावे लागत असल्याचे दूध संघाकडून सांगण्यात आले आहे. वारंवार दूध संकलन बंद राहत असल्याने दुग्ध व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सहकारी दूध संस्था, खाजगी दूध संस्था यांना मोठ्या आर्थिक अरिष्टास सामोरे जावे लागत आहे.
शेजाऱ्यापाजाऱ्यांना दूधवाटप
एक दोन दिवसानंतर दूध संकलन बंद राहत असल्याने ग्रामीण भागातील दूध उत्पादकांना ज्यादाच्या दुधाचे काय करावे असा प्रश्न पडत आहे. काही दूध उत्पादक गावातील शेजाऱ्यांना दुधाचे वाटप करताना दिसत आहेत, तर काही दूध उत्पादक शेतकरी दुधाचे पेढे, बासुंदी आदी उपपदार्थ घरी तयार करताना दिसत आहेत.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |