सातारा : सातार्यात गतवर्षी झालेल्या अभूतपूर्व सुरुची राडा प्रकरणातील संशयितावर आजही पोलीस दलाची वक्रदृष्ट कायम आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सुरुची राड्यातील तब्बल ५५ जण सातारा पोलिसांच्या रडारवर असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. येत्या दोन दिवसात त्यांचा फैसला होणार असून कितीजण तात्पुरते तडीपार होणार याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.
खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये गेल्यावर्षी आनेवाडी टोल नाक्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसन सातार्यात तुफान राड्यात झाले होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खासदार व आमदार यांच्यासह त्यांचे समर्थक एकमेकांना भिडले होते. आमदारांचे निवासस्थान असणार्या सुरुची बांगला परिसरातच तोडफोड, जाळपोळीसह फायरिंग झाल्याने अवघा सातारा हादरला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अखेर पोलिसी बळ वापरल्याने पुढील अनर्थ टळला होता. सुरुचीच्या अभूतपूर्व राडाप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही नेत्यांसह ३०७ सह विविध कलमाखाली एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.
आता सध्या गणपती उत्सवाचा माहोल आहे. गणेश विसर्जना दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ नये यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याने खबरदारी घेतली आहे. सुरुची राड्यातील ५५ जणांना तात्पुरते तडीपार करावे यासाठी प्रस्ताव तयार करून ते पोलीस उपविभागीय कार्यालयात पाठवण्यात आले आहेत. यावर आणखी दोन दिवस सुनावणी होणार असून त्यानंतर नेमकी कारवाई होणार आहे. यामुळे ५५ जनांपैकी कितीजण तडीपार होणार? सर्वांचा नंबर लागणार की काहीजण वाचणार? याकडे आता लक्ष लागले आहे.
सातार्यात सध्या दोन्ही राजांमध्ये टशन सुरु आहे. गणेश विसर्जनाच्या मुद्यांवरुन दोन्ही नेते आमनेसामने आल्याने अघोषित तणावाचे वातावरण आहे. यामुळे विसर्जनादिवशी लॉ ऍन्ड ऑर्डरचा प्रश्न चिघळू नये यासाठी पोलिस दल सतर्क झाले आहे. जिल्ह्यात सर्वच पोलिस ठाण्याअंतर्गत तात्पुरती तडीपारी कारवाईचा धडाका सुरु आहे. शाहूपुरी पोलिसांनी हीच संधी साधत सुरुची राडाप्रकरणातील संशयितांसह इतर रेकॉर्डवर असणार्यांची यादी तयार केली आहे. गणेश विसर्जनादिवशी संबंधितांमुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांचे तात्पुरते तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |