चेन्नई : तामिळनाडूमधील कांचीपूरम मठाचे मठाधिपती शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामींचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. जयेंद्र सरस्वती कांचीपूरम मठाचे ६९ वे मठाधिपती होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षांपासून त्यांची तब्बेत खालावली होती.
शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव सुब्रहमण्यम महादेव अय्यर असे होते. श्री चंद्रसेकरेंद्र सरस्वती स्वामीगल यांनी २२ मार्च १९५४ रोजी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या नावाची घोषणा केली होती. २००३ मध्ये शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी कांचीपूरम मठाचे अधिपती म्हणून ५० वर्षे पूर्ण केली होती. १९८३ त्यांनी शंकर विजयेन्द्र सरस्वती यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली होती.
कांचीपूरम मंदिरात २००४ मध्ये एका कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह २२ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. नऊ वर्षांनंतर त्यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
आदी शंकराचार्य यांनी पाचव्या शतकात कांचीपूरम या मठाची स्थापना केली होती. याच मठाचे जयेंद्र सरस्वती हे प्रमुख होते. या मठाकडून अनेक शाळा आणि अनेक रूग्णालये चालवण्यात येत होती.
शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, अर्थमंत्री अरूण जेटली, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसने ट्विटवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |