10:53pm | Nov 02, 2018 |
वडूज : वडूज येथील बहुचर्चीत व टायगर ग्रुपचा तालुकाध्यक्ष शैलेश रमेश जाधव उर्फ शैलेश बाबा यास बेकायदेशीर विनापरवाना गावठी पिस्तुल, शस्त्रे बाळगल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी काल (गुरुवारी ता. 1) मध्यरात्री अटक केली.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश जाधव याच्याकडे विनापरवाना व बेकायदेशीर शस्त्रे असल्याची तसेच परिसरातील मुली व महिलांना त्रास देत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे व सहकार्यांनी गुरूवारी रात्रगस्ती दरम्यान येथील आयलँड चौका शेजारी कराड-दहिवडी रस्त्यालगत शैलेश जाधव यास राहत असलेल्या दोन मजली इमारतीच्या वरील खोलीमध्ये तसेच त्याचे संपर्क कार्यालयात व चार चाकी वाहन क्रमांक (एम.एच. 11 सी.जी. 8923) याठिकाणी छापा टाकून दोन गावठी पिस्तुल, पाच जीवंत काडतूस, तीन तलवारी, एक सत्तुर, एक गुप्ती, दोन सुरा, दोन कुर्हाडी, पाच मोबाईल, दोन लॅपटॉप, दोन चैनी, दोन अंगठ्या, पाच घड्याळे, अशी शासनाने मनाई केलेली अग्निशस्त्रे, जिवंत काडतुसे आदी शस्त्रे हस्तगत केली. शैलेश जाधव याच्याकडून 11 लाख 25 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
शासकीय कामात अडथळा, अरेरावीची भाषा वापरल्याबद्दल तसेच स्वत:ची अटक टाळण्यासाठी सरकारी कर्मचार्यांना धक्काबुक्की व दुखापत करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी वडूज पोलीस फिर्याद दाखल केली आहे. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शैलश जाधव यास न्यायलायत हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस निरिक्षक यशवंत शिर्के करीत आहेत.
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कट्टे यांच्यासह पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, सतिश कर्पे, पोपट बिचुकले, गणेश कापरे, किशोर भोसले, सागर भुजबळ, तसेच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिर्के, सहा फौजदार प्रकाश हांगे, पो हवालदार दत्तात्रय जाधव, नितीन निकम, विलास हांगे, सचिन साळुंखे, राहुल मदने, सुहास गाडे, लोखंडे, कदम, महिला पोलीस हवालदार सविता वाघमारे, नीलम रासकर सहभागी झाले होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |