06:21pm | Jul 04, 2018 |
सातारा : संपूर्ण देशात 2020 पर्यंत मेडीकल टूरिझम वाढविण्याच्या अनुषंगाने परदेशातील अनेक संस्था सुमारे 500 बिलीयन गुंतवणूक करणार आहेत. महाराष्ट्र हेल्थ अॅन्ड वेलनेस टूरिझमच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कार्यशाळेत मुंबई येथे पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्रातील इगतपुरीनजीक शासनाने दोन भव्य असे 100 एकर जागा असलेले प्लॉट निश्चित केले असून तेथे मेडीकल टूरीझम हब उभारण्यात येणार आहे.
या कार्यशाळेसाठी पॅनडोझा सोल्युशन प्रा.लि. यांच्यावतीने हेल्थ अॅन्ड वेलनेस टूरिझम मेळावा मुंबई येथील बांद्रास्थित ताज हॉटेल येथे घेण्यात आला होता. या कार्यशाळेसाठी वैद्यकीय दंतचिकित्सा, आयुष हॉस्पीटॅलिटी व पर्यटन उद्योगाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पदमश्री रमाकांत पांडा, गांभीयाचे राजदूत जैन बा जॅग्यु, पॅन्डोझा सोल्यूशन प्रा.लि.चे संचालक डॉ. मालविका खडके, डॉ. अनिल बनकर आणि रेखा चौधरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यशाळेच्या उत्तरार्धात राज्याचे स्कील डेव्हलपमेंट अॅन्ड लेबरचे विद्यमान मंत्री ना. संभाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मेडीकल टूरीझम अर्थात वेद्यकीय पर्यटन हे मोठया प्रभावीपणे काम करत आहेत. उपस्थितांना विश्वास देताना ते म्हणाले की, या उद्योग क्षेत्रासाठी लागणारे प्रगतशील तंत्रज्ञान व बुध्दीसाठी मदत पुरवली जाईल.
पॅन्डोझा सोल्युशनने या वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात एक वेगळे पाऊल निर्माण केले असून महाराष्ट्र राज्य हे या उद्योग क्षेत्रातून सर्वसामान्यपणे चांगला फायदेशीर महसूल गोळा करेल.
संचालिका मालविका खडके यांनी राज्याच्या या महत्वपूर्ण अशा वैद्यकीय पर्यटन उपक्रमासाठी चांगली व दर्जेदार सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. व भविष्यकाळात उद्योगधंदा व गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी आहे असे त्या म्हणाल्या.
युनायटेड अरब अॅमीरेटसचे गल्फ मेडीकल युनिर्व्हसिटीचे असि. प्रोफेसर अनिल बनकर यांनी आपल्या मनोगतात या मेडीकल टूरीझमसाठी आम्ही सर्वतोपरी सहाय्य करून हा ब्रॅड महाराष्ट्र विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगितले.
या कार्यशाळेसाठी रिलांयन्स, हिंदुजा, एशियन हार्ट हॉस्पीटल, कोकिलाबेन, रहेजा, सै फी, संचेती आदी हॉस्पीटलचे तसेच मान्यवर डॉक्टर्स, वैद्यकीय पर्यटन क्षेत्राशी निगडीत फार्मा कंपनी, स्पा, ट्रॅव्हल एजन्सी, इंन्शुरन्स कंपनी, शासकीय प्रतिनिधी, गुंतवणूकदार, हॉटेल व एअरलायन्सचे मान्यवर प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |