सातारा : संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असून यावर आळा घालण्यासाठी लोकांनी घरातच थांबावे, असे आवाहन वेळोवेळी जिल्हा प्रशासन तथा पोलिसांनी केले आहे. जे घराबाहेर पडतील, त्यांना काठीचा प्रसाद मिळत आहे. काहींची वाहने जप्त केली जात आहेत. अशा गंभीर स्थितीत मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणार्या व्हाईट कॉलर नागरिकांना केवळ समजच का? अशा चर्चांना समाजमाध्यमांमध्ये ऊत आला आहे.
ग्रामीण भागात सामान्य कष्टकरी, शेतमजूर तसेच ऊसतोड कामगार यांची अवस्था लॉक डाऊनमुळे बिकट झाली आहे. ज्यांना कायमचे छप्पर नाही, असा गरीबसुद्धा हेही दिवस जातील, असे समजून आपल्या खोप्यात विसावला आहे. काहींकडे कोणतेही माध्यम नसतानाही घरात बसणे ही सूचना अंमलात आणली जात आहे. खरे म्हणजे हातातोंडाची त्यामुळे गाठ पडत नाही. परंतू आदेशाचे पालन करणे, हा एककलमी कार्यक्रम घरातघरात सुरु आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत असताना सातारा शहरानजिक असलेल्या अजिंक्यतारा किल्ला, जिल्हा परिषद मैदान, महामार्ग, कोटेश्वर मैदान, कुरणेश्वर याठिकाणी दुचाकी घेवून काही महाभाग मॉर्निंग वॉक करीत आहेत. गरीबांना पोलिसांकडून काठ्या पडत असताना या सुशिक्षितांना मॉर्निंग वॉकचे पास दिले आहेत काय? अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात आली होती. खात्री करण्यासाठी नमुना म्हणून अजिंक्यतारा किल्ल्यावर होणार्या मॉर्निंग वॉकबद्दल सातारा पोलिसांना माहिती दिल्यानंतर अनेक व्हाईट कॉलर तथा सामाजिक कार्यकर्ते खुलेआम फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. मॉर्निंग वॉकसाठी अनेकजण नियमितपणे जातात. लॉक डाऊननंतर अनेकांनी सूचनांचे पालन केले. 22 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत घरी थांबण्याचा काहींनी चांगला निर्णय घेतला. तसेच काहींनी मानवता भावना जपून इतरांना मदतसुद्धा केली आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी, उद्योगपती, कलावंत, साहित्यिक, पत्रकार यांचा समावेश आहे.
अजिंक्यतार्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. खरे म्हणजे संचारबंदी आदेशाचा भंग करुन त्यांनी कायदा मोडला आहे. किमान त्यांच्यावर 151 कलम लावून दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित होते. त्याऐवजी त्यांना केवळ समज देवून सोडून देण्यात आले. याचा अर्थ त्यांनी केलेली चूक फारशी गंभीर नव्हती का? तसेच व्हाईट कॉलरवाल्यांसाठी नियम शिथील का करण्यात आला? याचे उत्तर आता जिल्हा पोलीस प्रशासनाला द्यावे लागणार आहे. गोरगरीबांच्या घरातील चूल पेटणे मुश्किल झाले आहे. सामाजिक जाणीव असलेले त्यांना मदत करीत आहेत. या एकाच आशेवर सध्या ते जीवन जगत आहेत. अशावेळी त्यांचा तरी आदर्श घेवून या व्हाईट कॉलरवाल्यांनी त्याचा बोध घेणे गरजेचे होते. आज त्यांना समज दिली आहे. आता यापुढे गरीबांनाही समजच द्यावी लागणार आहे. यापूर्वी जिल्हा व पोलीस प्रशासनाने कडक कारवाईचे संकेत दिले होते. असे असताना समज देण्याचा प्रकार कशामुळे घडला? त्याची पुनरावृत्ती होईल का? याबाबत आता आत्मपरिक्षण करणे पोलिसांनी कर्तव्य समजावे. सातारा जिल्ह्यात पोलीस यंत्रणेने कोठेही फारसा बळाचा वापर न करता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर इतरांना मदतसुद्धा केली आहे. त्यामुळे पोलिसांबद्दल सर्वांनाच आपुलकी वाटत आहे. अशावेळी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांमुळे असे प्रकार पुन्हा घडू नयेत, अशी सूचना आता पोलीस अधीक्षकांनी पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेला द्यावी, अशी मागणी होवू लागली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |