सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंटजवळ संशयितरित्या फिरणाऱ्या एका युवकाकडून स्थानिक गुन्हे शाखेने एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.
मुख्य सूत्रधार अमित उर्फ कोयत्या राजेंद्र पवार (वय १९, रा. बारामती), भानुदास उर्फ काका लक्ष्मण धोत्रे (वय ३९, रा. कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एक युवक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला तेथे तत्काळ पाठविले. अमित पवार याची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने माझ्याजवळ असलेले पिस्टल कराड येथे राहणाऱ्या भानुदास धोत्रे याला द्यायचे आहे, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवून धोत्रे यालाही कराडमधून अटक केली.
दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, अमित पवार याच्यावर बारामती येथे खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे तर धोत्रेवर कराड पोलीस ठाण्यात मारामारीचे विविध गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सातारा शहर पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |