मुंबई : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली आहे. अरुण गवळीने शिक्षेला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. २ मार्च २००७ रोजी मुंबईमधील असल्फा भागात कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली. यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालायने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. हत्येसाठी अरुण गवळीने ३० लाखांची सुपारी दिली होती. न्यायालायने अरुण गवळीसोबत इतर दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सोबत १४ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. अरुण गवळीसोबत इतरांनीही जन्मठेपेच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने याचिका फेटाळली असून जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.
गवळीला या घटनेनंतर एका वर्षाने अटक करण्यात आली होती. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला त्याच्या दगडी चाळीत जाऊन अटक केली होती.
काय आहे कमलाकर जामसंडेकर प्रकरण?
कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वे याने अरुण गवळीच्या टोळीमधील दोन व्यक्तींना जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यांनी सदाशिव सुर्वेची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने या हत्येसाठी ३० लाखांची सुपारी मागितली होती. सदाशिव सुर्वेने होकार दिल्यावर गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर यांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले होते. यानंतर शूटरच्या मदतीने २ मार्च २००७ रोजी कलमाकर जामसंडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी गोळीबार करत हत्या करण्यात आली.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |