02:37am | Feb 25, 2020 |
सातारा : श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दि 24 फेब्रुवारी रोजी गरिबांना मदत व्हावी असे उपक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. त्याला सातार्यातील निष्ठावंत समर्थकांनीच प्रतिसाद देऊन सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान केले. त्यामुळे गरीब रुग्णांना रक्त मिळणे सोपे झाले आहे.
श्री. छ. भोसले हे नेहमीच सातारा जिल्ह्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देतात.रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान तरीही सातारा परिसरातील सरकारी व खाजगी रुग्णालयांच्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने उदयनराजेंच्या वाढदिनी शाहू मंडळ, आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट व नगरसेवक प्रशांत आहेरराव मित्र समूहाच्यावतीने भव्य असे रक्तदान शिबीर घेण्यात आले. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना अपेक्षित असलेला त्यांचा वाढदिवस या रक्तदान उपक्रमातून साजरा झाला.त्याचे त्यांनाही कौतुक केले आहे.
सातारा नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेतले.इतरांनी जाहिरातबाजी करण्यातच धन्यता मानली का? अशी आता गरजू रक्तदात्यांच्या नातेवाईक मंडळीमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या शिबिरात तब्बल 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक प्रशांत आहेरराव म्हणाले, रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे रक्तदात्यांनी अधिकाअधिक रक्तदान करणे गरजेचे आहे. या शिबिरात जवळपास 90 समर्थक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरास सातारचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, सभापती यशोधन नारकर, डाईनेल फरांदे, सागर राजेमहाडीक, सामाजिक कार्यकर्ते भाऊ जगदाळे, बंडू सूर्यवंशी, अजित गुजर, नासीर शेख यांनी भेट दिली. रक्तदान शिबिरासाठी भूषण खानविलकर, प्रवीण मोने, पप्पू मंडावले, आशुतोष निगडे, संतोष लांडगे, शैलेश गुजर, प्रसाद पवार, ज्ञानेश्वर कोळी, नितीन पवार, विक्रम आहेरराव, पृथ्वीराज आहेरराव, अंजू सोनावणे, सुरेंद्र जाणकर यांनी परिश्रम घेतले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |