पुणे : गणेश पेठ दूधभट्टीलगतच्या नागझरी नाल्यात एका पंधरा ते सोळा वर्षांच्या मुलासह दोघा पुरुषांचे मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळल्याने शहरात खळबळ उडाली. कचरा गोळा करण्याऱ्या दोन गटातील भांडणावरुन हे तिहेरी हत्याकांड प्रकरण घडल्याचं उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे, तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे.
दरम्यान, तीन मृतांपैकी दोन जणांची ओळख पटवण्यात पोलिसांनी यश आले आहे. मृतांमध्ये असलेल्या लहान मुलाचं नाव नावेद आहे तर दुस-या मृत व्यक्तीचे नाव संदीप अवसरे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयित आरोपी बाप्या उर्फ रवींद्र जगन सोनवणे आणि विक्रम दीपकसिंग परदेशी यांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसरा संशयित आरोपी मुन्ना भंगारवाला फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
दोघेही संशयित आरोपी हे गांजा, अन्य अमली पदार्थांच्या सेवनामुळे नशेत असून अद्याप त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. तरीही त्याचा गुन्ह्यात सहभाग असावा एवढे पुरावे पोलिसांकडे उपलब्ध झाले आहेत. सोमवारी (23 फेब्रुवारी) संध्याकाळी पेठेतील नागझरीत 3 मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा छडा गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) रवींद्र सेनगांवकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ.बसवराज तेली, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सतीश निकम, सीताराम मोरे, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम यांच्या शह इतर अधिकारी व फरासखाना पोलिसांनी लावला आहे.
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |