01:56am | Nov 27, 2018 |
सातारा : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय फलटण (एक्साईज) येथील शरद किसन कानडे (वय 50) या फौजदाराने बिअर मालकाला दरमहिना 3 हजार रुपयांचा हप्ता देण्यासाठी पैशांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तक्रार दिली असून मंथलीसाठी हप्ता मागितल्याने त्याबाबत खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांचे बिअर बार आहेे. तक्रारदार यांच्या बिअर बारला कोणताही त्रास न देण्यासाठी मंथली म्हणून 3 हजार रुपयांची मागणी झाली. ही मागणी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय फलटणचा फौजदार शरद कानडे याने केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली. 20 ऑक्टोबर रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिल्यानंतर एसीबी विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीमध्ये संशयित कानडे याने तडजोडीअंती 2 हजार रुपयांची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्यानंतर मात्र संशयित कानडे याने पैसे स्वीकारले नाहीत. यामुळे अखेर सोमवारी एसीबीच्यावतीने कानडे याच्याविरुध्द लाचेच्या मागणी झाली असल्याची तक्रार दिली. अद्याप संशयिताला ताब्यात घेतले नसून एसीबी विभागा त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |