08:47pm | Jun 01, 2018 |
सातारा : देशात आणि राज्यात डीजल आणि पेट्रोल दरवाढ झाल्यामुळे जनता हैराण झाली आहे. गेल्या सोळा दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक पेट्रोल डीजल दरवाढ झाल्यामुळे सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. गरीब लोकांचे पैसे लुबाडणाऱ्या अशा सरकारला आता घरी बसले पाहीजे असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी झालेल्या आंदोलना दरम्यान केले.
देशात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मोदी सरकारने अच्छे दिन येतील असे सांगितले होते परंतु चार वर्षे उलटून सुद्धा या सरकारला अच्छे दिन आंत आले नाहीत. त्यामुळे अच्छे दिन सोडाच परंतु आता भाजपचेचं बुरे दिन येणार आहेत. देशात सर्वात जास्त महाग डिझेल पेट्रोल महाराष्ट्रात मिळत आहे. लोकांच्या खिशावर डल्ला मारून केंद्र व राज्य सरकार विकास करू पाहत आहे. मात्र अद्यापही सरकारला विकासाचा मार्ग सापडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरे करतायेत परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील सामान्य माणसाच्या खात्यात अजूनही 15 लाख रुपये जमा झाले नाहीत. हे फक्त बोलघेवडे सरकार आहे पाकिस्तानातून साखर मागून देशातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान या सरकारने केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी, बेरोजगार युवकांनी या सरकारला घरी बसवले पाहिजे. असे प्रतिपादन आ. शिंदे यांनी आंदोलकांना संबोधित करताना केले.
दरम्यान राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेट्रोल पंपाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली, तसेच राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी प्रतिकात्मक पेट्रोल पंपाची तोडफोड केली. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांना यासंदर्भात निवेदन दिले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने राज्य सरचिटणीस गोरखनाथ नलावडे, विक्रांत शिर्के, समीर राजे-घाटगे, सनी शिर्के यांच्यासह राष्ट्रवादी युवकच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |