01:32am | Jul 31, 2018 |
दहिवडी : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा समाज समन्वयक समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर मोर्चे व ठिय्या आंदोलने करत आहे. माण तालुक्यातही मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार करत सर्व पक्ष, गटतट सोडून समाजासाठी एकवटत रस्त्यावर उतरला आहे. पाच हजांराच्यावर मराठा समाजबांधव व महिला भगिनींच्या उपस्थितीत दहिवडीत भगवामय वातावरणात भव्य रँली काढत समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला करण्यात आले .
दहिवडी ता.माण येथे माण तालुका मराठा समाजाच्या वतीने श्री सिध्दनाथ मंदीराजवळ उपस्थित राहून जेष्ठ नागरीकांच्या हस्ते मराठा समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून एक मराठा लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ,छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ,जयभवानी जयशिवाजी ,मराठा खडा तो सरकारसे बडा अशा घोषणा देत दहिवडी शहरातून शांततेने रँली काढली.यावेळी दहिवडी शहर भगवामय झाल्याचे दिसून येत होते. शांततेने व आचारसंहितेचे पालन करत रस्त्यावर तीन रांगा करत रँली तहसिल कार्यालयासमोर गेल्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे, रोहण तोडकर या सहकाऱ्यांनी आपला जीव गमवाला असून त्यांना श्रध्दांजली वाहत समाजाने ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी मराठा समाज बांधवांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
आरक्षणासाठी शासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असून समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे.आरक्षण नसल्यामुळे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा अनेकांनी वाचला.आरक्षण नसूनही आमची मुले जिद्द , चिकाटी , आत्मविश्वासाने यश खेचून आणत आहेत.आरक्षण मिळाले तर समाजाचा सर्वांगीण विकास होणार आहे.आरक्षणासाठी शासनाला ९ ऑगस्टपर्यंत समन्वय समितीच्या वतीने अंतिम तारीख देण्यात आली आहे.तोपर्यंत शासनाने आरक्षण दिले तर ठिक अन्यथा त्यापुढे समाज शांत बसणार नाही. मराठा समाजाची सहनशीलता आजपर्यंत शासनाने पाहिली आहे या पुढे तसे होणार नाही.मोघलांना सळो की पळो करून सोडणारे हे मावळे शासनाला सळो की पळो करून सोडतील.अशा तीव्र भावना व्यक्त केल्या गेल्या.
साताऱ्यात मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या प्रकारानंतर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण पाटील यांच्यासह ६ सहाय्यक पोलीस निरिक्षक ,५७ पोलीस कर्मचारी ,१० होमगार्ड ,३३ कर्मचाऱ्यांची एस.आर.फी.एफ.ची एक तुकडी असा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता. मात्र मराठा समाजाची आंदोलनाची आचारसंहिता व शांततेच्या मार्गामुळे पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास झाला नाही.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |