म्हसवडः माण तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपूत्र व पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास मानसिंग माने यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोल्हापूर येथील समर्थ फांऊंडेशनच्या वतीने नुकताच कोल्हापूर येथे "उद्योग भूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील समर्थ फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील जिद्द आणि कष्टाच्या जोरावर नावलौकिक मिळविलेल्या राज्यातील विविध क्षेत्रात गौरवास्पद काम करणार्या व्यक्तींना हा पुरस्कार पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार आदर्श गाव लोधवडेचे सुपुत्र रामदास माने यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना "उद्योग भुषण पुरस्कार " प्रदान करण्यात आला. यावेळी जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री विनयरावजी कोरे , थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ , कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी संभाजी गायकवाड , आशा होमिओपॅथीचे डॉ. बी.एस.भोसले , उद्योजक शिवराज पाटील , राजकुमार देसाई , संस्थापक यशवंतराव पाटील , अध्यक्ष सुहास पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
माण तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपूत्र पंरतु व्यावसायानिमित पूणे येथे स्थायिक झालेले व सर्व सामान्यातील एक प्रेरणादायी आदर्श उद्योजक रामदास माने यांनी ध्येयाच्या , कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर साता समूद्रापार पोहोचले आहेत. तसेच त्यांनी रोजगार उपलब्ध करून अनेक शेकडो कुंटुंबीय माने यांनी उभी केली आहेत. माने यांनी उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात ही भरीव काम केले आहे. गरिब मूलीच्या विवाह सोहळ्यात आहेर म्हणून आधूनिक रेडिमेड शौचालय भेट देवून सामाजिक सेवेचा वसा जपला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा व उद्योग क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
रामदास माने यांनी बाल मजूर ( वेटर ) ते आंतरराष्ट्रीय उद्योजक असा प्रवास करताना आलेल्या संकटांना खंबीरपणे तोंड दिले आहे. रामदास माने यांना अनेक पूरस्कार मिळाले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून मोठे व्यावसायिक यश मिळविणार्या व्यक्तीसाठी कोल्हापूर येथील समर्थ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उद्योग भुषण या पुरस्काराचे रामदास माने हे माण तालुक्यातील पहिलेच मानकरी ठरले आहेत.
रामदास माने यांनी भारताबरोबर परदेशात ही नावलौकिक मिळविला आहे. दुसर्याच्या कंपनीत कामाला केलेली सुरुवात आणि सध्या स्वतः ची कंपनी त्यांनी साता समुद्रापलीकडे जाऊन पोहचली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे माण तालुक्यातील अनेक मान्यवरांसह लोधवडे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |