सातारा : आर्थिक फायद्याकरिता कमी व्याज दरात कर्ज मिळवून देतो, असे सांगून 1 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक करून विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका मुंबईकरावर गुन्हा दाखल झाला आहे. सातार्यातील एका वकिलाचेही तक्रारीत नाव असून त्या वकिलाने मुंबईकराची ओळख करून देत महिलेला धमकी देऊन शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे सातारा पोलिस दलातील एका पोलिसाचीही या प्रकरणात फसवणूक झाली असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नारायण मारुती चौधरी (रा.दादाभाई चाळ, लोअर परेल, मुंबई) व अॅड. शिवराज चंद्रकांत पवार (रा.शनिवार पेठ, सातारा) या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कराड तालुक्यातील एका महिलेने तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिलेची सातार्यातील अॅड. शिवराज पवार यांच्याशी मार्च महिन्यात ओळख झाली. तक्रारदार यांना कराड येथे फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांना कर्ज हवे होेते. यावेळी अॅड.पवार याने मुंबईतील नारायण चौधरी हे ओळखीचे असल्याचे सांगून ते गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज मिळवून देतात, असे सांगितले. तक्रारदार यांनी चर्चा केल्यानंतर शेअर्स व कमिशन असे एकूण 1 लाख 24 हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार 80 हजार आरटीजीएसद्वारे भरले व उर्वरित रक्कम रोख दिली.
या घटनेनंतर खूप दिवस वाट पाहिल्यानंतरही कर्ज मिळत नव्हते. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे देवून कर्ज लांबणीवर जात होते. अखेर कर्ज मिळत नसल्याने तक्रारदार महिलेने चौधरी याला फोन लावला असता त्याने अपशब्द वापरुन महिलेचा विनयभंग केला. याबाबत ती महिला वकीलांना भेटली असता त्या वकीलानेही महिलेला दमदाटी करुन शिवीगाळ केली. या सर्व घटनेमुळे तक्रारदार महिलेने शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द तक्रार दिली आहेे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |