तृतीयपंथी समुदायाची आरोग्य तपासणी करत साता-यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरने पाडला नवा पायंडा
सातारा : तृतीयपंथी देखील आपल्याच समाजाचा भाग असून आजही समाजाकडून त्यांना स्विकारले जात नसल्याने उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे जगावे लागत आहे. मात्र ही दरी दूर करत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने साता-यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरने पुढाकार घेतला. तृतीयपंथी यांच्या करिता याठिकाणी सेंटरच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. यामध्ये सीबीसी, एचआयव्ही,एचबीएसएजी, ईसीजी, पॅप स्मिअर, मेमोग्राफी यांसारख्या तपासणी करण्यात आल्या तसेच विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात आली.
तृतीयपंथी समुदायाला अजूनही जगण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास तपासणीकरिता रुग्णालयात गेल्यास त्यांना वॉर्डबॉपासून ते डॉक्टरांपर्यंतच्या भेदभावाला सामोरे जावे लागते. एक रुग्ण म्हणून त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले जात नाही आणि कायम दुर्लक्ष केले जात असल्याची व्यथा या समुदयाकडून मांडण्यात़ येते. याचेच भान ठेवून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवण्यासाठी साता-यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने या समुदयातील व्यक्तींकरिता आरोग्य तपासणी शिबीरासारखा स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला असून समुदयातील व्यक्तींनी त्याचा लाभ घेत स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घेतली तसेच तज्ञांच्या मार्गर्शनाखाली शंकांचे निरसन याठिकाणी करण्यात आले. यावेळी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष श्री उदय देशमुख, व्यवस्थापकीय संचालक श्री सचिन देशमुख, तृतीयपंथी समाज अध्यक्ष प्रशांत वारकर, दंतचिकीत्सक डॉ प्रसाद कवारे, कर्करोग तज्ञ डॉ सिध्देश त्र्यंबके आदी मान्यवर उपस्थित होते.
तृतीयपंथी देखील आपल्याच समाजाचा भाग असून आजही समाजाकडून त्यांना स्विकारले जात नसल्याने उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे जगावे लागत आहे. मात्र ही दरी दूर करत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने साता-यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरने पुढाकार घेतला.